Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून महिलेला निर्वस्त्र करून मारहाण !

महिलांचे नेतृत्व करणार्‍या तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एका महिलेला निर्वस्त्र करून मारहाण 
करत असतील, तर पक्षाची महिलांच्या संदर्भातील धोरणे काय असतील, याचा विचारही न केलेला बरा ! 
     कोलकाता - ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंगालच्या बर्दवान जिल्ह्याच्या नेपाकुली झापानतला भागात एका महिलेला निर्वस्त्र करून अमानुष केली. 
       तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते ब्रजगोपाल घोष त्यांच्या २० समर्थकांसह त्यांच्या घरी सभा घेत होते. अनुमती नसतांना ही सभा घेण्यास घरमालकाच्या मुलाने विरोध केला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या ब्रजगोपाल आणि त्यांचे समर्थक यांनी युवकाला मारहाण करणे चालू केले. त्यामुळे या लोकांनी मुलाला सोडण्याची मागणी करणार्‍या त्याच्या आईला निर्वस्त्र करून मारहाण केली. स्थानिक लोकांनी पीडितेला मारहाणीपासून वाचवले. त्यानंतर तिला कलना महकमा रुग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केली आहे; मात्र अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आली नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn