Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रत्नागिरी जिल्ह्यातील नोव्हेंबर २०१६ मधील हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्यात धर्माभिमान्यांचा सहभाग !

श्री. संजय जोशी
१. प्रांतीय हिंदू अधिवेशनामुळे जिल्ह्यातील 
राष्ट्रीय हिंदू आंदोलन आणि धर्मशिक्षणवर्ग यांत वृद्धी !
     रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे प्रांतीय हिंदू अधिवेशन २० नोव्हेंबर २०१६ या दिवशी चिपळूण येथील स्वामी मंगल हॉल, बहादूरशेख नाका येथे पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र वारकरी प्रबोधन सेवा मंडळाचे कोकण प्रांत उपाध्यक्ष ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे यांच्या हस्ते झाले. या अधिवेशनाला महाराष्ट्र वारकरी प्रबोधन सेवा मंडळ, महाराष्ट्र वारकरी महामंडळ, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री संप्रदाय, शिवसेना, श्री योग वेदांत सेवा समिती, फुरुस ग्रामदेवता देवस्थान आदींचे मुख्य प्रतिनिधी, तसेच वाचक, हिंदुत्वनिष्ठ, हितचिंतक असे ५४ जण उपस्थित होते. या वेळी रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक महिन्याला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्याचे ठरले. जिल्ह्यात ६ ठिकाणी हिंदूसंघटन मेळावे आणि ६ ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे धर्मप्रेमींनी सांगितले. ६ धर्माभिमान्यांनी धर्मप्रसारासाठी नियमित वेळ देणार असल्याचे उत्स्फूर्तपणे सांगितले.
२. प्रशिक्षणार्थींनी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्याचे आणि 
नामजप अन् स्वभावदोष सारणी लिखाण करणार असल्याचे उत्स्फूर्तपणे सांगणे
     राजापूर तालुक्यातील भू येथे २७ नोव्हेंबर २०१६ या दिवशी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग प्रशिक्षक निर्मिती शिबीर पार पडले. यामध्ये भू आणि ओणी पंचक्रोशीत चालू असलेल्या ६ स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांतील १९ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. संजय जोशी यांनी आदर्श व्यक्तीमत्त्व बनण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया कशी करावी, नामजप कोणता करावा यांविषयी मार्गदर्शन केले. गटचर्चेच्या वेळी १६ प्रशिक्षणार्थींनी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग स्वतःहून घेणार असल्याचे आणि सर्व प्रशिक्षणार्थींनी नियमित नामजप अन् स्वभावदोष सारणी लिखाण करणार असल्याचे उत्स्फूर्तपणे सांगितले. 
३. फटाक्यांच्या दुष्परिणामांविषयी प्रबोधनानंतर फटाक्यांचा वापर ७५ प्रतिशत बंद होणे
    दिवाळीपूर्वी समितीच्या वतीने राजापूर तालुक्यात घेण्यात येणार्‍या धर्मशिक्षणवर्गांच्या ठिकाणी फटाक्यांच्या दुष्परिणामांविषयी प्रबोधन केल्यानंतर तेथे फटाक्यांचा वापर ७५ प्रतिशत बंद झाला.
- श्री. संजय जोशी, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, रत्नागिरी. (३.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn