Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातनच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला निश्‍चित यश मिळणार ! - श्रीश्रीश्री सिद्धलिंगेश्‍वर महास्वामी, करुणेश्‍वर मठ, कर्नाटक

शिवपाडी (कर्नाटक) येथे प्रांतीय हिंदू अधिवेशनाचा समारोप
फर्स्ट एड ट्रेनिंग (प्रथमोपचार प्रशिक्षण) या इंग्रजी भाषेतील सनातनच्या 
ग्रंथांच्या तीन भागांचे प्रकाशन करतांना डावीकडून श्रीश्रीश्री सिद्धलिंगेश्‍वर 
महास्वामी, श्रीश्रीश्री मुक्तानंदस्वामी, सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम, 
श्री. प्रमोद मुतालिक आणि श्री. गुरुप्रसाद
    शिवपाडी (कर्नाटक) - हिंदु राष्ट्र पुन्हा बलिष्ठ करण्यासाठी सनातन संस्था प्रामाणिक कार्य करत आहे. हे राष्ट्र हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी कटिबद्ध झालेली हिंदु जनजागृती समितीसुद्धा तिच्या कार्यात यशस्वी होत आहे. या देशात सहस्रो संघटना असून प्रत्येक संघटना पर्याय म्हणून राजकीय पक्ष वाढवून, अधिकार मिळवून नंतर स्वार्थासाठी कृती करत आहेत. दुसरीकडे मात्र सनातन संस्था हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कोणत्याही पक्षावर अवलंबून न रहाता केवळ भगवंताचे अधिष्ठान ठेवून मार्गक्रमण करत आहे; म्हणूनच यश प्राप्त होणार आहे, असे प्रतिपादन कर्नाटकच्या आंदोल येथील करुणेश्‍वर मठाचे श्रीश्रीश्री सिद्धलिंगेश्‍वर महास्वामी यांनी केलेे. शिवपाडी येथे समितीने आयोजित केलेल्या २ दिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशनाच्या सांगता समारंभात ते मार्गदर्शन करत होते.
हिंदु नेत्यांची हत्या करून हिंदु संघटनांची शक्ती नष्ट करण्याचे षड्यंत्र ! - श्री. प्रमोद मुतालिक
    या वेळी बोलतांना श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले, अत्यंत दुर्बल आणि अप्रामाणिक व्यक्ती आपल्या देशाची पहिली पंतप्रधान झाली, हे आपले दुर्भाग्यच म्हणावे लागेल. त्याचे फळ म्हणूनच आजही काश्मीरच्या हिंदूंवर अमानवीय अत्याचार होत आहेत. हिंदु नेत्यांची हत्या करून हिंदु संघटनांची शक्ती नष्ट करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप यांच्याप्रमाणे कार्य करण्याचेे दायित्व हिंदु संघटनांवर आहे. त्यासाठी आपण सिद्ध होऊया. 
विश्‍वगुरुपदासाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले योग्य ! - श्रीश्रीश्री मुक्तानंदस्वामी 
     करंजी मठाचे श्रीश्रीश्री मुक्तानंदस्वामी म्हणाले, भारतभूमी जगाची विश्‍वगुरु होण्याचा काळ निर्माण झाला आहे. त्यासाठी स्वतः विश्‍वगुरूंची आवश्यकता आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यासाठी योग्य आहेत. सनातन संस्था सातत्याने ग्रंथ प्रकाशित करून समाजाला धर्माचरण करण्यासाठी प्रेरणा देत आहे. आज प्रकाशित झालेला प्रथमोपचार प्रशिक्षणाचा ग्रंथ पुढे येऊ घातलेल्या आपत्काळात राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करणार्‍या आम्हा सर्वांना मार्गदर्शक आहे. काळानुसार आजही आपण सर्वांनी प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई जन्माला यावी, अशी प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे.
    समारोप करतांना हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद म्हणाले, या दोन दिवसांच्या हिंदू अधिवेशनात अनेक हिंदुत्वनिष्ठांनी त्यांचे विचार मांडले आहेत. हे विचार आम्ही स्वतःच्या गावात जाऊन प्रत्यक्ष कृतीत आणणे अत्यंत आवश्यक झाले आहे. २ वर्षांपासून कर्नाटकातील काँग्रेस सरकार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणण्याचा प्रयत्न करत आहे. या संदर्भात जनजागृती करून शासनाला हा कायदा प्रत्यक्षात आणण्यापासून रोखले पाहिजे.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn