Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गंगावती (कर्नाटक) येथे रस्त्यावर ध्वज लावण्यास विरोध केल्याने धर्मांधांनी हिंदूंची मालमत्ता जाळली !

पोलिसांचा धर्मांधांवर कारवाई करण्यास नकार !
पाकिस्तान आणि बांगलादेश प्रमाणे काँग्रेसच्या राज्यातील असुरक्षित हिंदू ! 
या घटनेविषयी एकही निधर्मी, पुरोगामी आणि लेखक धर्मांधांना असहिष्णु
म्हणणार नाही कि त्यांच्या विरोधात पुरस्कार परत करणार नाही !
     गंगावती (कर्नाटक) - ईदच्या दिवशी धर्मांधांना शहराच्या रस्त्यांवर ध्वज लावण्यास विरोध केल्याने धर्मांधांनी चिडून हिंदूंच्या दुकानांना आणि घरांना आग लावल्याची घटना या शहरात १२ डिसेंबरला घडली. शहरातील धर्मांध ईदच्या दिवशी रस्त्यावर ध्वज लावत होते. अशी काही प्रथा नसल्याने त्याच वेळी हनुमानाचा उत्सव साजरा करत असलेल्या हिंदूंनी आक्षेप घेतला. तसेच हनुमान आणि अयप्पा देवतांच्या भाविकांनी शांतपणे पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकाराला आळा घालावा, अशी पोलिसांना विनंती केली; मात्र पोलिसांनी धर्मांधांवर काहीही कारवाई न करता उलट पोलीस ठाण्याच्या बाहेर जमलेल्या हिंदूंवर लाठीमार केला. (अशा पोलिसांची नावे आणि बक्कल क्रमांक सनातन प्रभातला कळवा ! - संपादक) त्यात अनेक हिंदू घायाळ झाले. तिकडे मोकळे रान मिळाल्याने धर्मांधांनी शहरात हैदोस घातला. तुफान दगडफेक केली आणि अनेक ठिकाणी आग लावली. त्यात अनेक दुकाने आणि वाहने भस्मसात झाली. (कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजणारे धर्मांध अन् ती रोखण्यासाठी काहीही न करणारे निष्क्रीय पोलीस ! - संपादक)      कोप्पाला येथील खासदार श्री. कराडी संगम्मा यांनी या घटनेचा निषेध केला असून उत्तरदायी पोलीस अधिकारी बिरादार यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बिरादार यांना निलंबित करण्याचे आश्‍वासन दिले. या सर्व घटनेस जुबेद नावाचा गुंड मूळ कारण आहे; मात्र पोलिसांनी त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही, असे श्री. कराडी संगम्मा यांनी सांगितले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn