Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांना वाढदिवसानिमित्त कु. दीपाली पवार यांनी दिलेल्या शुभेच्छापत्रातील लिखाण !

डॉ.(सौ.) नंदिनी सामंत
कु. दीपाली पवार
१. शुभेच्छापत्राचा लखोटा 
गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा ! : ईश्‍वराचे पृथ्वीवरील चालते-बोलते रूप म्हणजे श्री गुरु ! वाघाच्या जबड्यात सापडलेले श्‍वापद ज्याप्रमाणे सुटत नाही, त्याप्रमाणे ज्याच्यावर श्रीगुरूंनी कृपा केली, तो मोक्षाला जाईपर्यंत गुरु त्याला केव्हाही सोडून देत नाहीत. गुरु आपल्या डोळ्यांतून, शब्दांतून किंवा स्पर्शाने कृपेचा ओघ भक्ताकडे वळवतात. गुरूंच्या कृपेचा पूर्ण लाभ व्हावा, यासाठी शिष्यालाही सतत प्रयत्न (साधना) करावे लागतात.
‘चिकाटी’ या गुणावर प्रसन्न होऊन प.पू. भक्तराज महाराज 
सौ. नंदिनीताईंना आशीर्वाद देत असल्याचे भावचित्र ! 
‘सौ. नंदिनीताई : बाबा, मी तुमच्या चरणी संपूर्णपणे शरण आले आहे.
बाबा, माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी साधना होत नाही. माझ्यात पालट होत नाहीत. बाबा, मला क्षमा करा. मला काहीच जमत नाही. काहीच कळत नाही. मी ‘तुम्हाला अपेक्षित अशी नंदिनी’ कशी आणि कधी होणार ? मला कळत नाही.
प.पू. बाबा : अगं नंदिनी, काळजी करू नकोस. तू इतकी वर्षे साधनेत टिकून राहिलीस आणि प्रगती, प्रयत्न होत नाहीत; म्हणून साधना, आश्रम सोडून न जाता चिकाटीने साधनेत, आश्रमातच स्वतःला टिकवून ठेवले आहेस. तुझी ही चिकाटी मला आवडली. प्रगती आणि प्रयत्नांचे म्हणशील, तर ‘माझी आणि डॉक्टरांची (प.पू. डॉक्टरांची) कृपा तुझ्यावर असतांना तुझी प्रगती झाली नाही’, असे शक्य नाही. तू मला अशीच शरण येत रहा, म्हणजे तुझा उद्धार होईल.’ 
- कु. दीपाली पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१२.२०१३) 
कु. दीपाली पवार यांनी सौ. नंदिनी सामंत यांना वाढदिवसानिमित्त
सिद्ध केलेल्या शुभेच्छापत्रासमवेत प.पू. डॉक्टरांना लिहिलेले पत्र
॥ श्रीकृष्ण ॥
प.पू. डॉक्टर,                                                                                                                             ८.१२.२०१३
       आज सौ. नंदिनी सामंत यांचा वाढदिवस आहे. ताईंनी प.पू. भक्तराज महाराजांना (प.पू. बाबांना) पाहिले आहे. त्यांचा सहवास अनुभवला असल्यामुळे ‘प.पू. बाबांचेच छायाचित्र आणि बाबाच त्यांच्याशी बोलतात’, असे शुभेच्छापत्रात दाखवण्याचा विचार माझ्या मनात आला. त्यानुसार प.पू. बाबांचे चित्र काढले गेले. ताईंना हे शुभेच्छापत्र दिल्यावर त्यांची भावजागृती झाली आणि त्या म्हणाल्या, ‘‘प.पू. बाबांसमवेत अनुभवलेले सर्व दिवस आठवले.’’ त्यांना २ - ३ दिवसांपासून प.पू. बाबांचीच आठवण येत होती आणि ‘‘शुभेच्छापत्रात बाबाच बोलले’, हे पाहून पुष्कळ भाव जागृत झाला’’, असे त्या म्हणाल्या. प.पू. डॉक्टर, ‘कोणाला काय आवश्यक आहे’, हे तुम्हालाच ठाऊक आहे. मी कधी बाबांना पाहिले नाही कि त्यांच्याशी बोलले नाही, तरी त्यांचा संवाद लिहिला गेला. याचा सर्व कर्तेपणा तुमच्या चरणी अर्पण ! मला पहिल्यांदा प.पू. बाबांचे चित्र काढण्याची सेवा दिल्याबद्दल पुष्कळ कृतज्ञ आहे. 
(हे शुभेच्छापत्र ध्यानमंदिरात बसून बनवले आहे. तेथे बसल्यावर ही सर्व सूत्रे सुचली.)
तुमची,
- कु. दीपाली पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१२.२०१३)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn