Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अल्ला हू अकबर म्हणत रशियाच्या राजदूतांची तुर्कस्थानमध्ये हत्या !

    अंकारा (तुर्कस्थान) - तुर्कस्थानच्या मेवलूत मेर्त एडीन्टास या नावाच्या पोलीस अधिकार्‍याने अल्ला हू अकबर ओरडत रशियाचे तुर्कस्थानमधील राजदूत आंद्रे कार्लोव्ह यांची एका कार्यक्रमात हत्या केली. कार्लोव्ह अंकारा येथील एका चित्रप्रदर्शनात भाषण करत असतांना एडीन्टास याने त्यांच्यावर ८ गोळ्या झाडल्या. मेवलूतलाही पोलिसांनी तात्काळ गोळ्या घालत ठार केले. मेवलूत पोलिसांच्या दंगलविरोधी पथकात काम करत होता. कोर्लोव्ह यांनी भाषणाला प्रारंभ करताच मेवलूतने सिरीयातील अलेप्पो शहराविषयी घोषणा द्यायला प्रारंभ केला. अलेप्पो विसरू नका, सिरीयाला विसरू नका असे तो म्हणत होता. नंतर अल्ला हू अकबर म्हणत त्याने कार्लोव्ह यांच्यावर गोळ्या घातल्या. सुटाबुटात आणि पोलिसांचे ओळखपत्र असल्याने मेवलूत सहजपणे कार्लोव्ह यांच्याजवळ पोचला होता.
     तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तेपेय अर्दोआन यांनी ही हत्या तुर्कस्थान आणि रशिया यांमधील संबंध बिघडावेत, या उद्देशाने केली आहे, असा आरोप केला. या घटनेनंतर त्यांनी तत्काळ रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली.
     सीरीयामध्ये राष्ट्राध्यक्ष बशर अल् असाद, त्यांचे समर्थक आणि त्यांचे विरोधक यांच्यात युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये रशियाने असाद यांना समर्थन दिले आहे, ज्यामुळे तुर्की आणि रशिया यांच्यातील संबंध ताणले गेलेले आहेत. रशियाचा विरोध करण्यासाठी तुर्कीमध्ये विरोध प्रदर्शन करण्यात आले होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn