Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राष्ट्रद्रोह्यांचे विचार असे असतात - आम्ही धर्मनिरपेक्षच काय, देशनिरपेक्षही आहोत !

श्री. अनंत आठवले
प्रस्तुत लेखातील विचार श्री. अनंत आठवले यांचे स्वतःचे नसून त्यांनी आजच्या तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांची विचारधारा समर्पक शब्दांत मांडली आहे. या माध्यमातून धर्मनिरपेक्षतेच्या बुरख्याआड असलेले तथाकथित साम्यवाद्यांचे समाजविघातक, राष्ट्रद्रोही आणि पर्यायाने हिंदुद्रोही स्वरूप वाचकांच्या लक्षात येईल. - संपादक
   ‘काय वेडे लोक आहेत ! म्हणे पाकिस्तानशी क्रिकेट खेळायचे नाही !! आता तुम्हीच सांगा, राजनीतीचा आणि क्रिकेटचा काय संबंध ? पण नाही, ह्यांचा पोटशूळ उठतो. पुन्हा म्हणतात, ‘पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेऊ नका !’ आता काय म्हणावे ? कलेला देशाच्या सीमा असतात का ? आणि हो, पाकिस्तानी कलाकार किती अप्रतिम अभिनय करतात ! आपल्याकडे अभिनय येणारे कलाकार आहेतच कुठे ? पण नाही, हे लोक काव काव करणार ! 
   आता विचार करा, शिक्षक वर्गात शिकवतो. विद्यार्थी हिंदु आहे कि मुसलमान, हे बघतो का ? वैमानिक विमान उडवतो. तो हे विचारत नाही की, विमानात बसलेले लोक कोणत्या देशाचे आहेत ? पंचतारांकित हॉटेलमधील आचारी कुठे विचार करतो की, बनवलेले पदार्थ कोणत्या देशाच्या लोकांच्या पोटात जाणार आहेत ? आम्ही केवळ शिक्षक, चालक, आचारी, वैद्य, शेतकरी, श्रमिक, भाजीवाले आहोत. आम्ही आपला आपला व्यवसाय करतो. ह्याचा देशाशी काय संबंध ? कलेला जशा देशाच्या सीमा नसतात, त्याचप्रमाणे ज्ञानाला, पाककलेला, वैद्यकीलाही देशाच्या सीमा नसतातच. 
   सैनिकांनो, देशाशी संबंध केवळ तुमचा आहे. देशाचे रक्षण करणे, हे केवळ तुमचे कर्तव्य आहे, तुमचे दायित्व आहे. आम्ही तर धर्मनिरपेक्षच काय, देशनिरपेक्षही आहोत !’
- श्री. अनंत आठवले, फोंडा, गोवा. (१२.१२.२०१६)

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn