Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सगुणातील ईश्‍वराची अनुभूती देणारे एकमेवाद्वितीय संत प.पू. परशराम पांडे महाराज (वय ८९ वर्षे) !

प.पू. परशराम पांडे महाराज
      परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या या साधनेच्या विश्‍वातील एक उच्च विभूती म्हणजे प.पू. परशराम माधव पांडे महाराज (प.पू. बाबा) ! ३० नोव्हेंबर २०१६, म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी त्यांनी ९० व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने त्यांचे चरणी उतराई होण्यासाठी देवद आश्रमातील साधकांनी ही शब्द सुमनांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे लिखाण म्हणजे देवद आश्रमातील सर्व साधकांचे मनोगत आहे. त्यातील काही सूत्रे आपण ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.
४ ओ. प.पू. बाबा म्हणजे सूक्ष्म जगातील एक ज्ञानी विभूती असल्याविषयीचे विविध प्रसंग 
४ औ १. ओळख नसतांना सर्व काही ज्ञात असल्याप्रमाणे पहाणे : प.पू. बाबा म्हणजे सूक्ष्म जगातील एक ज्ञानी विभूती आहेत. मी मे २०१६ मध्ये देवद आश्रमात पहिल्यांदाच आलो होतो. ज्या दिवशी मी आश्रमात आलो, त्याच दिवशी मी त्यांच्या खोलीसमोरून जात असतांना त्यांनी खिडकीतून माझ्याकडे हसतमुखाने पाहिले. खरे तर मी त्यांना यापूर्वी कधीच भेटलेलो नाही; परंतु ते माझ्याविषयी सगळे काही जाणतात, अशा भावाने माझ्याकडे पहात होते. नंतर काही अनुभूतींमुळे मला जाणवले की, एखाद्या व्यक्तीला पाहिले की, तिच्याविषयीची सगळी माहिती प.पू. बाबांंना लगेच कळते. खरंच प.पू. बाबा म्हणजे सूक्ष्म जगातील एक ज्ञानी विभूती आहेत. व्यक्तीला पहिल्याबरोबर त्या व्यक्तीचा सर्व इतिहास त्यांच्या डोळ्यांसमोर उभा रहातो. 
     दुसर्‍या दिवशी मी अतिथीकक्षात बसलो असतांना प.पू. बाबा फिरण्यासाठी खोलीच्या बाहेर आले. तेव्हासुद्धा मला पाहून ते पुन्हा हसले आणि पुन्हा खोलीकडे वळले, मध्येच थांबले आणि वळून माझ्याकडे पाहून मला बोलावले आणि म्हणाले, माझ्या गावाकडचा असून माझ्याशी बोलत नाहीस ? मी कारंजा गावचा आहे, हे त्यांना कसे कळले, हे देवच जाणे !
४ औ २. शालेय परीक्षेतील गुणांना अध्यात्मात काहीच महत्त्व नसल्याचे सांगणे : मी मार्च २०१६ मध्ये १० वीची परीक्षा दिली. त्यात मला ८६ टक्के गुण मिळाले. तेव्हा बाबांनी मला बोलावले आणि म्हणाले, या ८६ टक्के गुणांना काहीच महत्त्व नाही. आता तू पूर्णवेळ झाला आहेस. तुझी खरी अध्यात्माची परीक्षा आता आहे. शाळेतील परीक्षा स्वार्थासाठी असते, तर अध्यात्मातील परीक्षा तुझ्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी आहे. तुझे वय किती आहे ? मी म्हणालो, १६ वर्षे ! बाबा म्हणाले, तुझे उत्तर चुकले आहे. आपले आधी कितीतरी जन्म झाले आहेत. ती वर्षे आणि या जन्मीची १६ वर्षे असे मिळून X+१६ वर्षे असे तुझे वय आहे. 
४ औ ३. प.पू. बाबांना उपाय करण्यासाठी प्रार्थना केल्यावर त्यांनी बोलावल्याचा निरोप मिळणे आणि त्यांनी सांगितलेले उपाय केल्यावर बरे वाटणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी बालवयापासूनच मला अनेक कलागुण देऊन त्या गुणांच्या माध्यमातून माझी साधना आणि धर्मकार्य करवून घेतले. त्याविषयी एका साधिकेने बाबांना सांगितले. तेव्हा बाबा माझ्याविषयी म्हणाले, हा तर माझा जवळचा मित्र आहे. त्यानंतर एके दिवशी मला अचानक तोंड आले. मला बोलता येईना. मी परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण करतांना मला प.पू. बाबाच दिसायचे. मला कळत नव्हते, असे का होत आहे ? नंतर मी प.पू. बाबांनाच मनातून हाक मारली आणि म्हणालो, 
     मी तुमचा मागील जन्मांचा मित्र आहे ना, तर माझ्यावर उपाय करा ना ! मला बोलताही येत नाही. पूर्ण शरीर जड झाले आहे. एवढ्यात एक साधक प.पू. बाबांनी मला बोलावल्याचा निरोप घेऊन आला. मी त्यांच्या खोलीत गेल्यावर मला उपायांना न बसवता ते म्हणाले, मित्रा, तू आजारी आहेस ना ? जेवला नाहीस ना ? जा प्रथम जेव. केवळ भात खा. मी भात खाल्ल्यावर माझे शरीर एकदम हलके झाले. ताप उतरला आणि आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे माझे आलेले तोंडसुद्धा नाहीसे झाले. प.पू. बाबांनी भात खाण्यास सांगून माझ्यावर उपाय केले. ते जे सांगतात ते १०० टक्के सत्य असते. - कु. तुषार काकड (वय १६ वर्षे) 
४ अं. प.पू. बाबांचे कपडे धुण्याची तीव्र इच्छा निर्माण होणे आणि त्यांच्या कृपेने ती दुसर्‍याच दिवशी पूर्ण होणे : एकदा मी एका संतांचे कपडे धुण्यासाठी प्रसाधनगृहात गेलो होतो. तेथे एक साधक प.पू. बाबांचे कपडे धूत असतांना मला ते धुवायला कधी मिळणार ? अशी तीव्र इच्छा मनात निर्माण झाली. त्या वेळी मी स्वत:ला सावरले आणि कपड्यांकडे बघूनच आनंद घेतला. दुसर्‍या दिवशी आमच्या विभागाकडे प.पू. बाबांचे कपडे धुण्याची पाळी होती. तेव्हा ती सेवा मला मिळाली. - एक साधक. 
५. परात्पर गुरु डॉक्टरांनी प.पू. बाबांचा केलेला गुणगौरव !
अ. प.पू. बाबांनीच देवद आश्रमाला लहानाचे मोठे केले. 
आ. तुम्ही एका ध्रुवावर, तर मी एका ध्रुवावर आहे. दोन ध्रुवावर आपण दोघे..! 
- सौ. अश्‍विनी पवार आणि कु. स्नेहा झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.११.२०१६)
इ. तुमच्याशी बोलतांना पुष्कळ ज्ञान मिळते. तसेच ते मध्ये मध्ये तुमच्या लेखांतून मिळतच असते. हे आमचे केवढे पुण्य आहे ! 
ई. प.पू. बाबांचे बोलणे म्हणजे एक लेख असतो. प.पू. महाराजांशी संभाषण म्हणजे एका ग्रंथाचा मजकूर झाला. (समाप्त)
- सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ (१९.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn