Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

छत्रपती शिवाजी महाराजांसारखे बहुआयामी व्यक्तीमत्व जगाच्या इतिहासात होणे असंभव ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या धर्तीवर सिंधुसागरात (अरबी समुद्र) साकारण्यात येणार्‍या भव्य शिवस्मारकाचे भूमीपूजन !
      मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमी तर होतेच शिवाय ते उत्तम प्रशासकही होते. संघर्षमय काळात त्यांनी हिंदुस्थानच्या इतिहासात प्रशासनाचा नवीन अध्याय लिहिला. महाराजांचे मावळ्यांचे संघटन करण्याचे कौशल्य, पाणीव्यवस्था आणि सामुद्रिक सामर्थ्य सर्वच प्रेरणादायी आहे. विदेशींनी आपल्या शासनावर आक्रमण करू नये यासाठी महाराजांनी स्वत: मुद्रा सिद्ध केली. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे बहुआयामी व्यक्तीमत्व जगाच्या इतिहासात होणे असंभव आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. २४ डिसेंबरला अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या भव्य शिवस्मारकाचे भूमिपूजन पार पडले. महाराष्ट्रातील विविध नद्यांचे पाणी आणि विविध ठिकाणांची माती असलेले कलश या वेळी मंत्रोच्चारासह जलार्पण करण्यात आले. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मंत्रीमंडळातील मंत्री, खासदार संभाजीराजे, खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणाचा आरंभ मराठी भाषेतून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून केला. या वेळी एमयुटीपी -३ अंतर्गत नव्या रेल्वेमार्गांचा शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी म्हणाले की, देशातील काळे धन संपवण्यासाठी आम्ही ८ नोव्हेंबरला लढाई चालू केली. यात देशातील सर्वसामान्य जनता सेनापती म्हणून सहभागी झाली आहे. या निर्णयानंतर मी ५० दिवस मागितले होते. प्रामाणिक जनतेचा त्रास त्यानंतर न्यून होईल. अप्रामाणिकांना जगणे मात्र कठीण होईल. मी अजूनही त्यांना सावध करत आहे, तसेच देशाचे कायदे, नियम स्वीकारून सुखी जीवन जगण्याचे निमंत्रण देत आहे.
     शिवरायांच्या गडकिल्ल्यांविषयी पंतप्रधान म्हणाले, पर्यटनाचा विषय येतो तेव्हा ताजमहालाचे सौंदर्य सर्वांना आकर्षित करते; मात्र गडकिल्ल्यांच्या ठेव्याचे जतन करण्यास आपण असमर्थ ठरलो आहोत. यावर पर्याय काढून महाराजांच्या गडकिल्ल्यांची जगासमोर ओळख होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विश्‍वविद्यालयांना किल्ल्यांच्या अभ्यासासाठी घोड्यावरून जाण्याची आम्ही व्यवस्था करू.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn