Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देशात कायद्याचा आधार घेत हिंदु धर्मावर आघात केले जात आहेत ! ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी मंडळ, सोलापूर

सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेला ३ सहस्र ८०० हिंदूंची उपस्थिती 

ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे

उपस्थित जनसमुदाय 
     सोलापूर, ५ डिसेंबर ( वार्ता.) कीर्तने, प्रवचने यांना कायद्याचा धाक दाखवला जातो; मात्र पहाटे ५ वाजताच्या अजानाकडे दुर्लक्ष केले जाते. या देशात कायद्याचा आधार घेत हिंदु धर्मावर आघात केले जात आहेत. मी एकट्याने काय करावे, असा विचार जर छत्रपती शिवरायांनी केला असता, तर आज आपल्याला गुडघ्यावर बसून दर्शन घ्यावे लागले असते. छत्रपती शिवरायांच्या कृपेनेच आज आम्ही कीर्तन, प्रवचन करू शकत आहोत. त्यासाठी आपल्यासमोर छत्रपती शिवरायांचाच आदर्श असायला हवा, असे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी व्यक्त केले. येथील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानात ४ डिसेंबरला आयोजित हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेचे साधक श्री. दैवेश रेडकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि रणरागिणी शाखेच्या सोलापूर जिल्हा संघटक सौ. अलका व्हनमारे उपस्थित होत्या. 

     ह.भ.प. इंगळे महाराज पुढे म्हणाले, "या देशात धर्माविषयी जागृती करावी लागते, देशाचा अभिमान बाळगा, हे सांगावे लागते, हे दुर्दैवी आहे. या देशात मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले जात आहे. कुटुंबप्रमुखच आपले कर्तव्य विसरत असेल, तर अशा सभांची आवश्यकता आहे. पंढरपूर येथे लक्षावधी भाविक वारीला येतात; परंतु या ठिकाणी पुरेशी शौचालयेसुद्धा नाहीत. यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत."
 १ लक्ष अनधिकृत घरे अधिकृत होऊ शकतात, तर मंदिरे का नाही ? 
     सोलापूर येथे प्रशासनाच्या वतीने प्रार्थनास्थळे पाडण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात कायद्याचा धाक दाखवून ४६ मंदिरे पाडली गेली. आता ५६ प्रार्थनास्थळे पाडण्याचा घाट घातला आहे. त्यामध्ये ५३ मंदिरे, २ मशिदी आणि केवळ एका चर्चचा समावेश आहे. मुंबईत १ लक्ष अनधिकृत घरे अधिकृत करण्यावर विधीमंडळात चर्चा घडवत असाल, तर मग मंदिरे अधिकृत करण्यासाठी का प्रयत्न केले जाऊ शकत नाहीत ? असा प्रश्‍न इंगळे महाराज यांनी उपस्थित केला. 
     हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची हिंदु धर्मजागृतीची तळमळ प्रचंड आहे. गेल्या १४ वर्षांपासून हे कार्यकर्ते धर्मासाठी नागरिकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो. धर्मकार्यासाठी त्यांना आमचे आयुष्यही लाभू दे, अशी प्रार्थना ह.भ.प. इंगळे महाराज यांनी केली. 
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघर्ष करावाच लागेल ! 
 सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती 
     या देशात केवळ हिंदूंची मंदिरे पाडली जातात; मात्र मशिदी, चर्च पाडले जात नाहीत. हिंदूंचा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांत ध्वनीक्षेपक रात्री उशिरापर्यंत लावले म्हणून पोलीस गुन्हे प्रविष्ट करतात; मग पहाटे ५ वाजता होणारा अजान आमच्यासाठी काय अंगाईगीत असते का, असा मार्मिक प्रश्‍न घनवट यांनी उपस्थित केला. अनधिकृत प्रार्थनास्थळे पाडण्याच्या नावाखाली प्रशासनाकडून हिंदूंची मंदिरे मोठ्या प्रमाणात पाडली जात आहेत. अशा वेळी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश काय आहेत, हेही हिंदूंनी पहायला हवेत. आपल्याला या विरोधात सनदशीर मार्गाने आणि संघटितपणे लढा देता येईल. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंना कायदे आणि अल्पसंख्यांकांना फायदे, असे शासनाचे धोरण आहे. या देशात एका षड्यंत्राद्वाारे हिंदूंचे शौर्य संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. या सभांच्या माध्यमातून हिंदूंचा जाज्वल्य इतिहास सांगून हिंदूंचे शौर्यजागरण करण्याचा प्रयत्न आहे. या देशासाठी प्राणार्पण केलेल्या भगतसिंहांना आतंकवादी ठरवले जाते, तर हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या टिपू सुलतानचा उदोउदो केला जातो, तसेच देशावर आक्रमण करणारे अफजल गुरु, कसाब यांना शहीद, तर अफझलखानाला सुफी संत मानले जाते. शासन एक सर्जिकल स्ट्राईक करून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे: मात्र त्यानंतरही कित्येक सैनिकांना त्यांचा प्राण गमवावा लागला आहे. सरकारने एक 'सर्जिकल स्ट्राईक' असा करावा की, पाकिस्तान नकाशावरून नष्ट झाला पाहिजे. छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून आतंकवाद कसा संपवायचा, हे दाखवून दिले आहे आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आहे. आपल्यालाही हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे; मात्र त्यासाठी संघर्ष अटळ आहे. 
६ डिसेंबर हा शौर्यदिन म्हणून साजरा करा ! 
     हिंदूंनी ६ डिसेंबर हा शौर्यदिन म्हणून साजरा करावा. या दिवशी अयोध्येतील बाबरी मशीद पाडली गेली, तसेच छत्रपत्री शिवरायांनी याच दिवशी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. या दिवशी हिंदूंनी आपल्या घरावर भगवे ध्वज फडकवून हा दिन शौर्यदिन म्हणून साजरा करावा. 
हिंदूंनी आता वीर मारुतीची उपासना करणे आवश्यक !-  दैवेश रेडकर, सनातन संस्था 

श्री. दैवेश रेडकर
     सनातनच्या साधकांवर खोटे आरोप करण्यात आले; परंतु सनातन संस्था ही आतंकवादी संस्था नसून धर्मशिक्षण देणारी संस्था आहे. डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्या प्रकरणांत सनातनच्या साधकांवर खोटे आरोप करून त्यांना अटक केली; कारण या पुरोगाम्यांचे गैरव्यवहार सनातन संस्थेने जगासमोर आणले. त्यांचे मारेकरी सापडत नाहीत; म्हणून सनातनच्या साधकांचा बळी दिला जात आहे. साडविलकर यांच्यासारखे खोटे साक्षीदार निर्माण केले जात आहेत. सनातन संस्थेने धर्मशिक्षण देणार्‍या १५ भाषांमधील ३५० ग्रंथांच्या ६५० लक्षांहून अधिक प्रती प्रकाशित केलेल्या आहेत. कोणतीही आतंकवादी संघटना इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रंथांची निर्मिती करू शकते का ? हिंदूंच्या विरोधात धर्मांध १४ जिहाद करतात. यातीलच एका जिहादद्वारे हिंदु नेत्यांच्या हत्या होत आहेत. या सर्व परिस्थितीला तोंड देण्यासाठी सध्याच्या काळात दास मारुतीची नव्हे; तर वीर मारुतीची उपासना करणे आवश्यक झालेे आहे. 
     श्री. दैवेश रेडकर यांनी 'आपण सनातनच्या पाठीशी आहात का ?', असा प्रश्‍न केल्यावर उपस्थित सर्व धर्माभिमान्यांनी हात उंचावून प्रतिसाद दिला. 
प्रत्येक स्त्रीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! 
 - सौ. अलका व्हनमारे, जिल्हा संघटक, रणरागिणी शाखा, सोलापूर 
     हिंदु धर्मियांची एक स्वत:ची शौर्यपरंपरा आहे; परंतु ही परंपरा आपण आज विसरलेलो आहोत. त्यामुळे हिंदु समाज असुरक्षित झाला आहे. निर्भया प्रकरणानंतर देश हादरला. आपले स्वत:चे रक्षण करण्याचा अधिकार कायद्यानेच दिला आहे. कायदे कडक केले; पण त्याचा काय उपयोग झाला ? ज्यांना अटक झाली, त्यातील एकाला तर अल्पवयीन म्हणून सुधारगृहात सुधारण्यासाठी पाठवण्यात आले. त्यानंतरही महिलांवरील अत्याचार वाढतच गेले. २४ मिनिटांनी एका महिलेवर बलात्कार होत आहे. लव्ह जिहादमुळे हिंदूंच्या दीड लक्ष मुली संपुष्टात आल्या आहेत. या समस्येला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक स्त्रीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम होणे आवश्यक आहे. 
व्यासपिठावरील मान्यवरांचा केला सत्कार...! 
श्री. दैवेश रेडकर
श्री. सुनील घनवट
ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे

     सभेच्या प्रारंभी ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. पुरोहित वैभव कामतकर आणि मुकुंद मुळेगांवकर यांंनी या वेळी वेदमंत्रपठण केले. त्यांचा सत्कार समितीचे श्री. तानाजी गोरे यांनी केला. सभेमध्ये श्री. सुनील घनवट आणि श्री. दैवेश रेडकर यांचा सत्कार माजी नगरसेवक बापू ढगे, तर ह.भ.प. इंगळे महाराज यांचा सत्कार सनातनचे साधक श्री. हिरालाल तिवारी यांनी केला. रणरागिणीच्या सौ. अलका व्हनमारे यांचा सत्कार सनातन संस्थेच्या सौ. भाग्यश्री पिसे यांनी केला. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची माहिती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी, तर सभेचे सूत्रसंचालन अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले. या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. सभेची सांगता श्‍लोकाने करण्यात आली. या वेळी सभेला ३ सहस्र ८०० धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. 
सोलापूर येथील सोनांकूर पशूवधगृह बंद पाडण्यासाठी 
अखेरच्या श्‍वासापर्यंत लढा देणारे गोरक्षक आणि प्राणीमित्र श्री. विलास शहा ! 
     श्री. विलास शहा (वय ८० वर्षे) हे गेल्या १५ वर्षांपासून सोलापूर येथील सोनांकूर पशूवधगृह कायमस्वरूपी बंद करण्यासाठी एकाकी लढा देत आहेत. शेवटच्या श्‍वासापर्यंत हा लढा चालू ठेवणार असल्याचे सभेच्या शेवटी झालेल्या बैठकीत त्यांनी सागितले. हे पशूवधगृह बंद करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला अनेक वेळा निवेदने देऊन शासनाकडे पाठपुरावा केला आहे. चार दिवसांपूर्वी पत्नीचे निधन झालेले असतांनाही ते स्थिर होते आणि हिंदु धर्मजागृती सभेलाही ते उपस्थित राहिले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि समन्वयक श्री. राजन बुणगे यांनी श्री. विलास शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असता, त्यांनी 'पशूवधगृह १०० तथ्य' आणि 'मांसाहार विश्‍वसंहाराकडे वाटचाल', ही पुस्तके या दोघांना भेट दिली. या वेळी त्यांच्या घरी एक पाटी लावण्यात आली होती. त्यात 'पत्नीची जैन पंथानुसार साधना झाली असल्यामुळे त्यांना चांगली गती मिळाली आहे; तरी कोणीही शोक करू नये, दु:ख आवरावे', असा उल्लेख करण्यात आला होता. 
धर्मजागृती सभेनंतरच्या मान्यवर वक्त्यांसमवेत  
झालेल्या बैठकीला १५० धर्माभिमानी हिंदूंची उत्स्फूर्त उपस्थिती ! 
     धर्मजागृती सभेनंतरच्या मान्यवर वक्त्यांसमवेत झालेल्या बैठकीला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी १५० धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती लाभली. या वेळी... 
१. माळकवठा आणि खानापूर या दोन ठिकाणी धर्मजागृती सभा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. 
२. १० ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग घेण्याची मागणी आली. 
३. २ ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाची मागणी करण्यात आली. 
४. मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविरुद्ध तक्रार करून जनआंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. 
५. महिन्यातून एक दिवस सोलापूर येथे सर्व धर्माभिमानी हिंदूंची बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले. 
६. महिन्यातून एकदा राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. 

वंदनीय उपस्थिती 
 ह.भ.प. दिगंबर महाराज फंड दादापूर यांचा सन्मान श्री. तानाजी गोरे यांनी केला. 
महान भारतीय संस्कृती 
कक्षाने सर्वांचे लक्ष वेधले ! 
     हिंदु संस्कृतीचे आचरण कसे करावे, याविषयी माहिती देणारा कक्ष उभारण्यात आला होता. यामध्ये बाल धर्मवीर कु. गुरुदास घोडके, तरुण आवार, ईश्‍वरी न्यामणे, साक्षी देवडीकर, सृष्टी देवडीकर, आर्या गांगजी आणि शालिनी आरळीमार त्याचबरोबर सनातनच्या साधिका सौ. लतिका पैलवान आणि कु. कोमल रगडे सहभागी झाल्या होत्या. उपस्थित अनेक धर्माभिमानी सभा संपल्यानंतर बालसाधक सादर करत असलेले 'महान भारतीय संस्कृती' हे नाट्य कक्षाच्या ठिकाणी थांबून पहात होते. 
क्षणचित्रे 
१. कवठे येथील सरपंच सुरेश रामचंद्र नरोटे यांनी कवठे येथे धर्मशिक्षण वर्गाची मागणी केली. 
२. कारंबा येथील ६ धर्माभिमानी हिंदू सभेला आले होते. त्यांनी १५ दिवसांतून एकदा समितीच्या कार्यकर्त्यांना संपर्कात रहाण्याची विनंती केली. 
३. कुंभारी गावचे सरपंच श्री. सिद्धराम इमडे तेथील चार धर्माभिमान्यांसह उपस्थित होते. 
४. शेळगी गावातील श्रीराम सेना आणि शिवप्रतिष्ठान या संघटनांतील १५० हून अधिक धर्माभिमानी हिंदू भगवा ध्वज घेऊन घोषणा देत सभास्थळी आल्याने सभास्थळी नवचैतन्य निर्माण झाले. 
५. सभास्थळी धर्मशिक्षणविषयक, तसेच हिंदूंवर होणार्‍या अन्यायाची माहिती देणारे भव्य प्रदर्शनही लावण्यात आले होते. 
६. 'जय भवानी जय शिवाजी !', 'जय श्रीराम', 'सनातन हिंदु धर्माचा विजय असो !', 'छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !', अशा उद्बोधक घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळे वातावरण उत्साही होते. 
७. ४० जणांनी अँड्राईड मोबाईल अ‍ॅप्लीकेशन सनातन पंचांग अ‍ॅप डाउनलोड करून घेतले. 
धर्मसभेला उपस्थित मान्यवर 
     नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, भावसार समाजाचे माजी नगरसेवक बापू ढगे, वीरशैव कैकय्या समाजाचे विवेक इंगळे, मोची समाजाचे रवि गोणे, जोशी समाजाचे ऋषी दोरकर, लखन भोसले, वडार समाजाचे संजय साळुंखे, विनायक विटकर, पद्मशाली समाजाचे सत्यनारायण गुर्रम, विजय इप्पाकायल, लिंगायत समाजाचे बसवराज इटकळे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक अंबादास गोरंटला, शहर संयोजक दीपक पवार, श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धराम नंदरगी, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता शांतीवीर मैंदरकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष महेश(आण्णा) कोठे, शिवसेना विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख महेश (भैय्या) धाराशिवकर, शिवसेना उपशहरप्रमुख सुनील कामाठी, यंत्रमाग संघटनेचे जिल्हाध्यक्ष पेंटप्पा गड्डम, गोरक्षक तथा प्राणीमित्र विलास शहा, गोरक्षक अभय कुलथे, शिवप्रतिष्ठानचे संदीप जाधव, शिवस्मारक महाआरती समूहाचे श्री. विजय कुलथे, अक्षय कट्टी, केसरी प्रतिष्ठानचे केदार पुजारी, आजोबा गणपति मंदिर ट्रस्ट सदस्य गंगाधर गवसणे, महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य शशी थोरात, श्री अयप्पा स्वामी धर्मशास्त्र चॅरिटेबल ट्रस्टचे ३ प्रतिनिधी 
धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी बहुमूल्य साहाय्य करणार्‍यांचे आभार ! 
१. धर्मजागृती सभेला श्री. दत्तात्रय जुगदार यांनी दिव्यांची व्यवस्था केली आणि जनरेटर उपलब्ध करून दिले. 
२. श्री श्री इव्हेन्ट्सचे भागीदार श्री. पुरुषोत्तम सग्गम यांनी मैदान उभारणी करून दिली. 
३. सचिन, प्रवीण मंडप कॉन्ट्रक्टर चे श्री. सचिन भिसे यांनी व्यासपीठ, मॅट आणि टेबल उपलब्ध करून दिले. 
४. श्री. रवि गोणे यांनी ध्वनीक्षेपण यंत्रणा उपलब्ध करून दिली. 
५. अंबिका मंगल भांडार यांनी खुर्ची आणि टेबल उपलब्ध करून दिले. 
६. श्री सिद्धेश्‍वर देवस्थान यांनी खुर्च्या उपलब्ध करून दिल्या. 
७. श्री. विश्‍वनाथ येलदी आणि श्री. राजेश सोनवणे यांनी वाहतुकीसाठी ट्रॉली उपलब्ध करून दिली. 
८. जीवन जलचे श्री. गणेेश सिद्धराम गोली आणि तपस्या पाणीचे श्री. सारंग उपाध्ये यांनी पाण्याचे जार उपलब्ध करून दिले. 
  
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn