Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गुरु आत्मज्योतीचे दर्शन ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
गुरु आत्मज्योतीचे दर्शन ।
गुरु करिती स्वयंप्रकाशी ।
गुरु काढिती माया-मोहातून ।
काय करावे या गुरूंचे वर्णन ॥ १ ॥

मोक्षाप्रती नेण्याकरता त्रास सोसून । 
इच्छा ज्याची-त्याची स्वतः समजून ।
काट्या-कुट्यांच्या मार्गातून ।
बाळा लागले का म्हणून ।
आता नको मागे राहू हात सोडून ।
अशा गुरूंचे काय करू वर्णन ॥ २ ॥
देह प्रारब्धाचे भोग भोगून संपवून ।
आत्मा चैतन्यस्वरूप करून ।
धरिले आम्हा कित्येक जन्मी साधना शिकवून ॥ ३ ॥

या आत्म्यात, देहात एक बिंदू म्हणून । 
तेच करतील तुझे आत्मसंरक्षण ।
संरक्षण होता, घे तेजाचे वलय साधून ॥ ४ ॥

आत्मतेजाचे तेज पसरू दे तुझ्यातून । 
वाणीतून तुझ्या बोलती सद्गुरुवचन ।
नको सोडू आता ध्येयपूर्ती झाल्यावाचून ॥ ५ ॥ 

षड्रिपूंच्या पाशातून बंध तोड सांगून ।
त्या साधनेचा साक्षीरूप बिंदू म्हणून । 
कोण आहेस सांगता करून विवरण । 
म्हणती आता घे आत्मज्योतीचे दर्शन ॥ ६ ॥

समजून घेतलेस जरी ।
चैतन्य, आनंद, शांतीशी एकरूप होऊन ।
तेच तुला सांगतील, तू आहेस कोण ? । 
प्रश्‍न नको करू, गुरु आहेत कोण ?।
गुरु माझे केवळ आत्मज्योतीचे दर्शन ॥ ७ ॥

भगवंत तुझ्यासाठी ते देण्या वरदहस्त म्हणून ।
काय हवे या जन्मी, या देही तुज लागून । 
गुरु आहेत तुझ्यासाठी कोण ।
आणि काय करावे या गुरूंचे वर्णन ॥ ८ ॥

- श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी, कोल्हापूर (३१.१०.२०१४)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn