Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

बांगलादेशी हिंदूंची व्हाईट हाऊससमोर निदर्शने !

    भारत सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना निष्क्रीय असल्याने भारतातील विशेषतः काश्मीर, उत्तरप्रदेशातील कैराना, आसाम, बंगाल, केरळ येथील पीडित हिंदूंनीही व्हाईट हाऊसच्या समोर निदर्शने करून त्यांच्या रक्षणासाठी साहाय्य करण्याची मागणी करावी, असेच हिंदूंना वाटेल ! 
    वॉशिंग्टन - बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचार थांबवून त्यांना संरक्षण देण्यात यावे, यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी साहाय्य करावे, या मागणीसाठी बांगलादेशी हिंदूंनी त्यांचे निवासस्थान असणार्‍या व्हाईट हाऊससमोर शांततामय निदर्शने केली. अशाच प्रकारची निदर्शने नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रम्प टॉवर समोर नुकतीच करण्यात आली होती.
    या प्रसंगी बराक ओबामा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपणास बांगलादेशमधील अल्पसंख्यांकांवर होणार्‍या अत्याचारांची कल्पना आहेच. या अल्पसंख्यांकांची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. आपण या प्रश्‍नावर त्वरित पावले उचलावीत, तसेच या अत्याचारांची जाणीव नूतन राष्ट्राध्यक्षांना करून द्यावी.
     ही निदर्शने हिंदू-बौद्ध-ख्रिस्ती एकता परिषदेने आयोजित केली होती. बांगलादेशमधील मंदिरे, हिंदूंची घरे आणि दुकाने यांची हानी, हिंदु महिलांवर होणारे बलात्कार, हिंदूंची भूमी बळकावणे आणि शेवटी हिंदूंच्या अमानुष हत्या यांवर बांगलादेश सरकार निष्क्रीय होऊन बसले आहे; कारण या अत्याचारांत सत्ताधारी पक्षाचे नेतेही सहभागी आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn