Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

ही संपत्ती माझी नाही, तर देशभरातील नेत्यांची, उद्योगपतींची ! - शहा यांचा दावा

  • या प्रकरणाचे केंद्र सरकारने गांभीर्याने अन्वेषण करून एवढ्या मोठ्या रकमेच्या मागे कोण मंडळी आहेत, हे मागील महिनाभर उन्हामध्ये बँकांसमोर रांगा लावून त्रास सहन करणार्‍या जनतेला सांगितले पाहिजे !
  • १३ सहस्र ८६० कोटी रुपयांचे उत्पन्न घोषित करणारे महेश शहा यांची चौकशी चालू !
       नवी देहली - केंद्राच्या उत्पन्न प्रकटीकरण योजनेअंतर्गत १३ सहस्र ८६० कोटी रुपयांचे उत्पन्न घोषित केल्यानंतर बेपत्ता झालेले व्यावसायिक महेश शहा यांना ३ डिसेंबरला आयकर विभागाने कह्यात घेतले होते. रात्रभर त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. पुन्हा ५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. शहा यांच्या कुटुंबियांच्या जिवाला धोका असल्यामुळे त्यांना पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. 
       या संपत्ती संदर्भात शहा यांनी सांगितले की, ही संपत्ती माझी नाही, तर देशभरातील नेत्यांची, उद्योगपत्तींची आहे. मी तर केवळ एक प्यादे आहे. कमिशनच्या लालसेपोटी काही लोकांच्या वतीने मी आयकर विभागाकडे माझे उत्पन्न घोषित केले होते. त्या लोकांची नावे मी काही विशिष्ट आयकर अधिकार्‍यांकडे उघड करीन. मी ज्यांचा पैसा उघड केला, त्यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली, त्यामुळे मी कराचा पहिला हप्ता भरू शकलो नाही. मी लवकरच सर्व काही उघड करीन. ज्यांनी मला भरीला घातले, ते लोक व्यावसायिक आणि राजकारणी असून मी त्यांची नावे उघड करीन. कमिशनच्या लालसेतून माझ्या हातून चूक झाली; परंतु मी सर्व काही उघड करीन. या संपूर्ण प्रकरणात सत्य बाहेर येईल.
       शहा यांनी उघड केलेल्या रकमेवर त्यांना ४५ टक्के कर द्यावा लागणार होता. कराची रक्कम ६ सहस्र २३७ कोटी रुपयांच्या घरात होती. ही रक्कम भरल्यानंतर त्यांचा उर्वरित पैसा वैध घोषित केला जाणार होता. उत्पन्न प्रकटीकरण योजनेचा भाग म्हणून शाह यांना ३० नोव्हेंबरपर्यंत १५६० कोटी रुपयांचा पहिला हफ्ता आयकर विभागाकडे भरावा लागणार होता. तथापि, आयकर विभागाने २८ नोव्हेंबर या दिवशी अचानक पैसे भरण्याचा फॉर्म क्रमांक २ रहित केला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn