Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शाहिस्तेखानावरचे आक्रमण हा सर्जिकल स्ट्राईक ! - विनायक पाटणकर

     पुणे, ११ डिसेंबर (वार्ता.) - छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर केलेले आक्रमण हा ‘सर्जिकल स्ट्राईक’च आहे. शिवरायांनी गडकिल्ले कह्यात घेऊन प्रदेशावर नियंत्रण प्रस्थापित केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेकरिता प्रदेश नियंत्रणाची नीती वापरली, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांनी केले. प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने शनिवारवाडा येथे ६ डिसेंबर या दिवशी शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
     या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. सुनील देवधर यांना हिंदुत्वगौरव पुरस्कार देण्यात आला, तर सांगलीचे हुतात्मा सैनिक नितीन कोळी यांचे वीरपिता सुभाष कोळी यांना ‘वीर जिवा महाले’ पुरस्कार आणि अधिवक्ता प्रशांत यादव यांना शिवभूषण गोपीनाथपंत बोकील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तरुणांनी सैन्य दलात जाऊन देशासाठी काम करायला हवे. माझा एक मुलगा हुतात्मा झाला असला, तरी दुसर्‍या मुलानेही सैन्यात जाऊन देशाची सेवी करावी, यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे श्री. कोळी यांनी सांगितले. ‘गावागावांमध्ये शिवचरित्र पोचवायला हवे, अशी भावना श्री. देवधर यांनी व्यक्त केली. या प्रसंगी युवा शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांचे शिवप्रताप या विषयावर व्याख्यान झाले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn