Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !

‘      वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. तथापि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी कोणत्याही आशादायी घटना स्थुलातून घडत नसतांना असे सांगणे, ही काहींना अतिशयोक्ती वाटेल; पण संतांमध्ये काळाच्या पडद्याआड पहाण्याचे सामर्थ्य असते; म्हणूनच अशा द्रष्ट्या संतांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या दिशेने प्रयत्न करणे, हीच आपली साधना आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता आहे. या विषयीची सविस्तर माहिती ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या नियमित सदरात आपल्याला मिळेल. आगामी काळात हिंदु समाजाला भारतभूमीत रामराज्याची अनुभूती देणारे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी खारीचा नव्हे, तर श्री हनुमंताचा वाटा उचलण्याची प्रेरणा यातून मिळावी, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना !
६ अ २. सूक्ष्मातील देवासुर युद्ध : प्रत्येक युगात देवासुर युद्ध होत असते. प्रत्येक युगात होणारे देवासुर युद्ध कलियुगातही सूक्ष्मातून चालू आहे. सप्तलोकातील चांगल्या आणि सप्तपाताळांतील वाईट शक्ती यांत चालू असणार्‍या या लढ्याचे स्थुलातून प्रगटीकरण भूतलावर दिसून येते. प्रत्येक घटना आणि कार्य स्थुलातून घडण्याआधीच सूक्ष्मातून घडत असते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे, 
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व
जित्वा शत्रून्भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् ।
मयैवैते निहताः पूर्वमेव
निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥ 
- श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ११, श्‍लोक ३३
अर्थ : म्हणूनच हे अर्जुना, ऊठ. यश मिळव. शत्रूंना जिंकून धनधान्यसंपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेलेले आहेत. हे सव्यसाची अर्जुना, तू केवळ निमित्तमात्र हो.
६ अ २ अ. सूक्ष्मातील युद्धाचे काही वर्षांनी स्थूल, म्हणजेच दृश्य परिणाम दिसतात ! : सप्तलोकातील चांगल्या आणि सप्तपाताळांतील वाईट शक्ती यांत चालू असणार्‍या या लढ्याचे स्थुलातून प्रगटीकरण भूतलावर दिसून येते. पृथ्वीवर दुष्टप्रवृत्ती प्रबळ होणे अथवा हरणे, हा त्या सूक्ष्मातील युद्धाचा परिणाम असतो. आतापर्यंत पाचव्या पाताळापर्यंतच्या वाईट शक्तींवर ब्राह्मतेजाद्वारे लढणार्‍या संतांनी विजय मिळवला आहे. सध्या ६ व्या पाताळांतील वाईट शक्तींच्या विरोधात सूक्ष्मातील युद्ध चालू आहे. सातव्या पाताळातील वाईट शक्ती प्रभावहीन झाल्यानंतरच सूक्ष्मातील लढा संपेल. सूक्ष्मातील लढ्याचे काही वर्षांनी स्थूल, म्हणजेच दृश्य परिणाम दिसतात. लोकसभेच्या निवडणुकीत तमोगुणप्रधान काँग्रेसादी राजकीय पक्षांचा पराभव करून रजोगुणप्रधान राजकीय पक्षांचा झालेला विजय, हाही सूक्ष्मातील युद्धाचाच स्थुलातील एक परिणाम आहे. हा विजय अंतिम नाही. कालांतराने वाईट शक्तींच्या विरोधात संतांनी सूक्ष्मातील युद्ध जिंकले की, सत्त्वगुणी शक्तींकडून भारतात हिंदु राष्ट्राची भारतात स्थापना होईल. 
    (याविषयीचे सविस्तर विवेचन ‘प्रकरण ४ - हिंदु राष्ट्राच्या निर्मितीतील अटळ प्रक्रिया : सूक्ष्मातील ‘देवासुर युद्ध’ !’ यात दिले आहे.) 
६ आ. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपूर्वी घडणार्‍या स्थुलातील प्रक्रिया : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची सूक्ष्मातील प्रक्रिया जाणून घेतल्यानंतर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपूर्वी घडणारी स्थुलातील प्रक्रिया जाणून घेऊया. 
६ आ १. अराजकसदृश्य स्थिती : वर्ष २०१८ नंतर अराजकाला आरंभ होईल. हे अराजक कोणत्याही राजकीय पक्षाला थांबवता येणार नाही. 
६ आ २. धर्मांधांच्या दंगली आणि हिंसाचार : देशाच्या फाळणीच्या वेळी जशा धर्मांधांनी दंगली घडवल्या होत्या, तशा दंगली २ - ३ वर्षांनी भारतभरातील धर्मांध घडवून आणण्यास सुरुवात करतील. 
६ आ ३. तिसरे महायुद्ध : काही वर्षांतच जगात तिसरे महायुद्ध चालू होईल. या महायुद्धाची अधिक झळ भारताला बसणार आहे. या युद्धात तमोगुणी शक्तींचा नाश होईल.’ (क्रमश:) ॐ
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’) 
हा ग्रंथ ऑनलाइन खरेदीसाठीही उपलब्ध !
यासाठी ‘सनातन शॉप’ च्या संकेतस्थळावरील पुढील लिंकला भेट द्या : goo.gl/TxlFr0 
(टीप : या लिंकमधील काही अक्षरे ‘कॅपिटल’ असल्याची नोंद घ्यावी.)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn