Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रामनाथी आश्रमातील साधिका कु. प्रतीक्षा हडकर यांना श्री अन्नपूर्णामातेने खीर भरवण्यासंबंधी आलेली अनुभूती

कु. प्रतीक्षा हडकर
      आध्यात्मिक त्रासांमुळे ग्लानी येतांना ‘श्री अन्नपूर्णामाता खीर भरवत आहे आणि ती साधकांनाही खीर वाढत आहे, तरी खिरीचे भांडे पूर्ण भरलेलेच आहे’, असे सूक्ष्मातून दिसणे : ‘३०.१०.२०१६ या दिवशी मला दिवसभरात मध्ये-मध्ये त्रासांमुळे ग्लानी येत होती. प्रतिदिन मी दुपारी १२ ते १२.३० या वेळेत जेवते; पण मला ग्लानी अधिक येत असल्याने ‘मी जेवले नाही’, याची जाणीव नव्हती. मी ग्लानीत असतांना ‘श्री अन्नपूर्णामाता तिच्या हातातील पळीने साधकांना खीर वाढत आहे’, असे दृश्य सूक्ष्मातून दिसले. त्याच क्षणी मला कुणाचा तरी स्पर्श झाला. तसेच तीन वेळा माझ्या डोक्यावरून कुणीतरी हात फिरवला आणि त्या वेळी मला आवाज ऐकू आला, ‘बाळा, उठतेस ना !’ त्यानंतर काही वेळाने अन्नपूर्णामाता मला खीर भरवत असल्याचे सूक्ष्मातून दिसले आणि खीर खातांना ‘माझ्या आत सुगंध जात आहे’, असे मला जाणवले. देवी एका बाजूला मला भरवत होती आणि दुसरीकडे साधकांना वाढत होती; पण भांड्यातील खीर अल्प न होता ते भांडे पूर्ण भरलेले दिसत होते.
     नंतर प्रत्यक्षातही स्वयंपाकघरातील साधिकेने खीरच खाण्यासाठी देणे आणि ती खीर खाऊनही त्या दिवशी उलटी येण्याचा त्रास न होणे : काही वेळाने मला साधिकेने हाक मारल्यासारखा आवाज ऐकू आला; म्हणून मी डोळे उघडले, तर त्या वेळी स्वयंपाकघरातील साधिका सुप्रियाताई (सौ. सुप्रिया माथूर) मला विचारत होती, ‘‘तू जेवलीस का ?’’ त्या वेळी तिला काय सांगावे, ते मला कळेना. नंतर माझ्या लक्षात आले, ‘आपण स्थुलातून जेवलो नाही; म्हणून अन्नपूर्णामातेने ताईला पाठवले असणार.’ त्या वेळी मला ‘मी खरेच जेवले का’, ते कळत नव्हते; पण माझे पोट भरले होते. ताईला म्हणाले, ‘‘मी जेवले नाही’’ त्यानंतर ताई खीर आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. त्या वेळी ‘अन्नपूर्णामाता तिच्या हाताने माझ्यासाठी खीर वाढून देत आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले. सुप्रियाताईने खीर आणून दिल्यावर मी ती खीर खाल्ली. एरव्हीला मला अन्न पचत नसल्याने उलटी येण्याचा त्रास होतो; पण त्या दिवशी मला तसा त्रास झाला नाही.’ 
- कु. प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१०.२०१६)
     या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn