Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कु. दीपाली मतकर गंभीर आजारातून बरी होण्यासाठी सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून महर्षींनी सांगितलेले उपाय

महर्षींचे कार्य !
     २४.१०.२०१६ या दिवशी प.पू. डॉक्टरांनी कु. दीपाली मतकर हिला झालेल्या डेंग्यू या गंभीर आजाराविषयी सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना कळवायला सांगितले. तसे कळवल्यावर महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना त्या त्या दिवशी पुढील उपाय सांगितले. ते ते उपाय त्यांनी स्वतः, तसेच इतरांनी करून महर्षींचे आज्ञापालन केले.
२४.१०.२०१६
 प्रार्थना आणि नामजप करायला सांगणे
कु. दीपाली मतकर
१. दीपालीसाठी कार्तिकपुत्री सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि उत्तरापुत्री सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी जास्तीत जास्त प्रार्थना कराव्यात. (त्याप्रमाणे त्या दोघी करत होत्या.)
२. रात्री ९ ते १२ पर्यंत पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् हे स्वतः नामजपाला बसले.
२५.१०.२०१६
    दीपालीसाठी काही विधी रामनाथी आश्रमात करायला हवेत का ?, असे प.पू. डॉक्टरांनी महर्षींना विचारायला सांगितले. तेव्हा महर्षि म्हणाले, गुरूंच्या मनात असा विचार आला आहे, तर आम्ही तुम्हाला याविषयी निश्‍चित कळवू. लक्ष्मीपूजनापर्यंत (३०.१०.२०१६ पर्यंत) दीपाली जगली, तर ती पुढे जगेल. नाहीतर, तिच्या जगण्याविषयी काही सांगू शकत नाही.

२६.१०.२०१६
१. महर्षींनी दीपालीसाठी मंत्र सांगणे
     अकालमृत्युहरणम् अपमृत्युनिवारणं सर्वरोगनिवारणम् ।
     मृत्युञ्जयं महाकालं नमस्यामि शनीश्‍वरं शनीश्‍वरम् ॥
     जयाय नमः ॥
     महर्षि म्हणाले, हा मंत्र एखाद्या चांगल्या साधकाने दीपालीच्या कानात म्हणावा. पुढे जमल्यास दीपाली हा मंत्र स्वतःच म्हणू शकते. (तसे शरणागत भावाने केले.)
२. महर्षींनी जय आपलाच होणार असल्याविषयी दिलेला संदेशात्मक आशीर्वाद
    उत्तराषाढातील गुरूंना आशीर्वाद आहेत. तुम्ही तुमची सेविका कु. दीपालीला आमच्याकडे सोपवले. त्याच क्षणी आम्ही तिला श्रीमत् नारायणाच्या कोमल चरणांवर सोपवले. या सर्व घटनाक्रमात तुम्हाला आमचा एकच आशीर्वाद आहे, तो म्हणजे जय मे जयम् ।
३. आयुष्यवृद्धी होम करण्यास सांगणे
     उद्या (२७.१०.२०१६ या दिवशी) दीपालीसाठी रामनाथी आश्रमात सनातनच्या वेदब्राह्मणांनी गुरूंकडून संकल्प करून घेऊन आयुष्यवृद्धी होम करावा.
२७.१०.२०१६
        महर्षींनी सांगितल्याप्रमाणे रामनाथी आश्रमात आयुष्यवृद्धी होम करण्यात आला.
२८.१०.२०१६
        पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी तमिळनाडूमध्ये असलेल्या तिरुवण्णामलई या शिवाच्या तीर्थक्षेत्री जाऊन तेथे एक विशेष हवन आणि पूजा केली, तसेच ९ ब्राह्मणांना वस्त्र दान केले.
२९.१०.२०१६
१. सकाळी ११ वाजता पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी तिरुवण्णामलई येथील अण्णामलईच्या (शिवाच्या) मंदिरात जाऊन शिवलिंगाला अभिषेक केला आणि संध्याकाळी अरुणाचल पर्वताला प्रदक्षिणा घातली.
२. महर्षि म्हणाले, सध्या दीपालीची प्रकृती ४० टक्के एवढीच बरी आहे आणि तेही गुरूंनी (प.पू. डॉक्टरांनी) तिला पुरवलेल्या ऊर्जेमुळे आहे. गुरूंचे तिच्याकडे अखंड लक्ष आहे.
३०.१०.२०१६
    दीपालीला जरा बरे वाटल्यावर महर्षि म्हणतात गुरूंमुळे (प.पू. डॉक्टर यांच्यामुळे) झाले, तर प.पू. डॉक्टर म्हणतात महर्षींमुळे झाले !
प.पू. डॉक्टर : दीपाली आजारी आहे, हे मला कळल्यावर मी महर्षींनाच उपाय विचारले. तसेच इतर आध्यात्मिक संकटांच्या वेळीही मी विचारतो. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे केल्याने साधकांचे त्रास दूर होतात. असे असतांना दीपालीला मी ऊर्जा पुरवली हे कसे ?
महर्षि : हे एक देवरहस्य आहे. गुरु साधकांसाठी सर्वकाही करतात; पण महर्षींमुळे झाले, असे म्हणतात. आम्हाला (महर्षींना) असे वाटते, साधकांकडून गुरूंची कीर्ती व्हावी; पण गुरूंना वाटते, साधकांनी महर्षींचीच कीर्ती करावी. हे असे का घडते ?, हे देवरहस्य वेळ आल्यावर उलगडेल किंवा उलगडणारही नाही.
    दीपालीसाठी महर्षींचे हे सर्व उपाय आम्हाला पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्यामुळे मिळाले. तसेच त्यांनी स्वतःही महर्षींचे आज्ञापालन करून दीपालीसाठी जप, हवन, अभिषेक, प्रदक्षिणा इत्यादी कष्ट घेऊन केले. महर्षि आणि पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्यामुळेच दीपाली बरी होऊ शकली. यासाठी आम्ही सर्व साधक त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत.
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn