Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

वर्धा येथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या गाडीतून रोख ३ लक्ष ३६ सहस्र रुपये कह्यात

        वर्धा, २८ नोव्हेंबर - येथील राष्ट्रवादीचे उमेदवार सुधीर कोठारी यांच्या गाडीतून ३ लक्ष ३६ सहस्र रुपये शासनाधीन करण्यात आले. या रकमेमध्ये सर्व ५०० च्या जुन्या नोटा आहेत. पोलिसांनी रात्री दीड वाजता नाकाबंदीच्या वेळी ही कारवाई केली. ही कारवाई चालू असतांना सुधीर कोठारी यांनी पोलिसांसमक्ष पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हे प्रकरण निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे सोपवले आहे. या नोटांचा वापर निवडणुकीच्या कालावधीत लोकांना वाटण्यासाठी होत असल्याचे बोलले जात आहे; मात्र रक्कम गाडीत सापडल्याने गुन्हा प्रविष्ट झालेला नाही. चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे कळते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn