Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळालेले यश म्हणजे जनतेने पंतप्रधानांच्या निर्णयाला दिलेला कौल ! - मुख्यमंत्री

     मुंबई, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - नवीन घर बांधायचे झाले, घराला रंग काढायचा झाला, तर थोडीतरी असुविधा होतेच. त्याप्रमाणे देशात परिवर्तन घडवायचे असेल, तर थोडा त्रास सहन करावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात परिवर्तन घडवून आणतील, याचा विश्‍वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे. नगरपालिका निवडणुकीत जनतेने भाजपला मत देऊन भाजपवर विश्‍वास दाखवला आहे. भाजपला मिळालेले यश म्हणजे जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला दिलेला कौल आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले. नगरपालिका निवडणुकीनंतर भाजपला मिळालेल्या विजयाविषयी माहिती देण्यासाठी २९ नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

     या वेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, "या निवडणुकीचा निकाल पहाता, देशात पालट होत आहे, असा विश्‍वास जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. नोटबंदीच्या निर्णयामुळे जनतेला त्रास होत आहे; मात्र देशासाठी जनता त्रास सहन करायला सिद्ध आहे. २०११ च्या नगरपालिका निवडणुकीत ८० नगरपालिकांमध्ये भाजपला एकही जागा मिळाली नव्हती, तर २६ नगरपालिकांमध्ये केवळ १-२ जागा प्राप्त झाल्या होत्या. मागील निवडणुकीचा निकाल पहाता, या निवडणुकीत भाजपने प्रचंड मोठा विजय प्राप्त केला आहे. या निवडणुकीत युती झाली असती, तर याहून मोठे यश प्राप्त झाले असते."
     या वेळी श्री. दानवे म्हणाले की, भाजप शिवसेनेशी युती करण्यासाठी नेहमी सिद्ध आहे. 
 नोटाबंदीच्या निर्णयानंतर रांगांमध्ये उभे राहून 
सामान्यांनी देशभक्तीत मोलाचा वाटा उचलला ! - मुख्यमंत्री 
     पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला भारतातील आणि महाराष्ट्रातील जनतेचा पाठिंबा आहे. या निर्णयानंतर रांगांमध्ये उभे राहून सामान्यांनी देशभक्तीत मोलाचा वाटा उचलला, असे मत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपची आघाडी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, "भाजप शिवरायांचा आदर्श समोर ठेवून काम करत आहे. हा विजय मी महाराष्ट्रातील जनतेला अर्पण करतो." (मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणेच सर्व राज्यकारभार करावा, अशीच जनतेची अपेक्षा आहे ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn