Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

बगलामुखी यागाच्या वेळी सौ. नेहा प्रभु यांना आलेल्या अनुभूती

सौ. नेहा प्रभु
१. त्रास होत असल्याने यज्ञस्थळी पूर्णवेळ थांबू नये, असे वाटणे : ९.१०.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात झालेल्या बगलामुखी यागाच्या वेळी मला सकाळपासून पुष्कळ त्रास होत होता. यज्ञस्थळी पूर्णवेळ थांबावे कि नाही, असा गोंधळ मनात होता. मला काय करावे ?, हे समजत नव्हते. 
२. गुरुदेवांच्या अपार कृपेमुळे मी यज्ञस्थळी पूर्णवेळ बसू शकले. त्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.
अ. सायंकाळच्या वेळी यज्ञस्थळी पुरोहित बगलामुखी देवीचे स्तोत्र म्हणत असतांना मला वातावरणात पिवळा प्रकाश पसरला आहे, असे दिसत होते. 
आ. मी अखंड चैतन्याचा स्रोत प्रक्षेपित होतांना पहात होते.
इ. नंतर माझा त्रास अल्प होत गेला. मी डोळे मिटल्यावर वेगळ्याच भावस्थितीत गेले. 
ई. माझे ब्रह्मरंध्राचे द्वार संपूर्णपणे उघडले आणि चैतन्याच्या धबधब्याने माझ्यात प्रवेश केला. माझ्या शरिरात एक मिनिटभर चैतन्य सळसळत होते. ते मी शब्दांत वर्णन करू शकत नाही. 
उ. सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी कृपाळू दृष्टीने पाहिल्यावर देवीने स्थुलातून पाहिल्याचे वाटून मन भरून येणे : देवीने माझा त्रास दूर केला. माझे जीवन सार्थकी लागले, असे वाटून माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. मी डोळे उघडले. तेव्हा सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी माझ्याकडे कृपाळू दृष्टीने पाहिले आणि सुंदर हास्य केले. देवीने स्थुलातून माझ्याकडे पाहिले, असे वाटून मला भरून आले. 
     प.पू. डॉक्टर, हे सर्व अनुभवण्याची माझी पात्रता नाही. तुम्ही माझ्यावर कृपा करत आहात. मला शुद्ध आणि पवित्र बनवून तुमच्या चरणी लीन करवून घ्या. 
- सौ. नेहा प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१०.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn