Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

इसिसमध्ये भरती झालेल्या कल्याणमधील आणखी एका तरुणाचा मृत्यू

       कल्याण - मे २०१४ मध्ये कल्याणमधून ४ तरुण इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेत भरती झाले होते. त्यांपैकी अमान तांडेल याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इराकवर सध्या चालू असणार्‍या हवाई आक्रमणात या तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. २६ नोव्हेंबरला रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास या तरुणाच्या कुटुंबियांना तुर्कीहून भ्रमणभाष आला होता. त्या वेळी भ्रमणभाषवरील संबंधित व्यक्तीने त्याच्या वडिलांशी आरंभी इतर बोलणी करून नंतर तुमचा मुलगा हवाई आक्रमणात मारला गेला आहे असे सांगून लगेच भ्रमणभाष ठेवून दिला. एका तरुणाचा मृत्यू मागील वर्षीच झाला होता.
       अमान हा इसिसचा कमांडर होता आणि त्याच्यावर भारतावर आक्रमण करण्याचे दायित्व होते.
       इसिसमध्ये सहभागी झालेल्या युवकांना मृत घोषित केल्याने पोलीस आणि अन्वेषण यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा पाठी लागत नाही. असे असल्यामुळे मृत घोषित केले जात आहे कि काय, अशीही चर्चा आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn