Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात झालेल्या श्री लक्ष्मीपूजनाचे सूक्ष्म-परीक्षण

कु. मधुरा भोसले
१. श्री लक्ष्मीदेवीचे अस्तित्व जाणवून आनंद होणे
     ‘लक्ष्मीपूजनाचा विधी चालू होण्याआधीच ‘ध्यानमंदिरात अनेक देवता जमलेल्या आहेत’, असे जाणवत होते. श्री लक्ष्मीदेवीचे अस्तित्व जाणवून आनंद होत होता. 
२. प.पू. डॉक्टरांच्या रूपाने श्रीविष्णुच 
ध्यानमंदिरात आल्याचे जाणवणे
    लक्ष्मीपूजनाचा आरंभ होण्याआधी प.पू. डॉक्टर ध्यानमंदिरात आले, तेव्हा ‘त्यांच्या रूपाने श्रीविष्णुच लक्ष्मीपूजनाचा पूजनविधी निर्विघ्नपणे पूर्ण होण्यासाठी ध्यानमंदिरात आला आहे’, असे जाणवले.
डावीकडून सदगुरु सौ बिंदा सिंगबाळ श्री लक्ष्मी देवीला
फुल वहातांना, साधक- पुरोहित लोमेश पाठक,
वेदमूर्ती ओंकार पाध्ये आणि मंदार मणेरीकर
  
३. स्थानदेवता, ग्रामदेवता आणि 
नवग्रहदेवता यांची ध्यानमंदिरात 
सूक्ष्मातून उपस्थिती जाणवणे
    स्थानदेवता, ग्रामदेवता आणि नवग्रहदेवता यांना पुरोहितांनी वंदन केल्यावर त्यांची ध्यानमंदिरात सूक्ष्मातून उपस्थिती जाणवून त्यांनी लक्ष्मीपूजनासाठी आशीर्वाद दिले.
४. श्री गणेशपूजनाच्या वेळी 
श्‍वेत रंगाच्या गणपतीचे दर्शन होणे
   श्री गणेशपूजनाच्या वेळी ध्यानमंदिरात श्‍वेत रंगाच्या गणपतीचे दर्शन झाले आणि श्री लक्ष्मीगणेश नावाच्या गणपतीच्या रूपाने लक्ष्मीपूजनासाठी आशीर्वाद दिला. 
५. स्वस्तिमंत्रांचे उच्चारण चालू असतांना वातावरणात चैतन्य आणि आनंद यांचे कारंजे उडतांना दिसले. 
६. शंख आणि घंटा यांचे पूजन केल्याने सात्त्विक नादाला चैतन्याची जोड मिळणे
    शंख आणि घंटा यांचे पूजन झाले. तेव्हा सात्त्विक नादाची निर्मिती करणार्‍या उपकरणांचे शुद्धीकरण होऊन सात्त्विक नादाला चैतन्याची जोड मिळाली. त्यामुळे या उपकरणातून उत्पन्न होणार्‍या नादाची सूक्ष्मतर स्तरावर कार्य करण्याची क्षमता वाढल्याचे जाणवले. 
७. कुबेराच्या प्रतिमेकडे करड्या आणि पारव्या रंगाची संमिश्र स्पंदने आकृष्ट होतांना दिसणे
     वरुण कलशावरील ताम्हनातील कुबेराच्या प्रतिमेचे पूजन चालू असतांना कुबेराचे आवाहन केल्यावर या प्रतिमेकडे करड्या आणि पारव्या रंगाची संमिश्र स्पंदने आकृष्ट होतांना दिसली. कुबेराने ‘चांगल्या प्रकारे धनसंचय करता यावा’, यासाठी साधकांना आशीर्वाद दिला. 
८. श्री महालक्ष्मीदेवीचे आवाहन केल्यावर वरुण कलशावर ठेवलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीकडे निळसर गुलाबी रंगाचे प्रकाशकिरण आकृष्ट होतांना दिसले. 
९. मूर्तीला जलाने स्नान घालत असतांना तिच्यातील 
अशुद्धता न्यून होऊन देवत्व प्रगट होऊ लागणे
     मूर्तीला जलाने स्नान घालत असतांना मूर्तीतील अशुद्धता न्यून होऊ लागली. ‘जलाच्या स्पर्शाने आपतत्त्व आणि मंत्रांच्या उच्चाराने तेजोमय आकाशतत्त्व यांच्या संयुक्त लहरींचा देवीच्या मूर्तीला स्पर्श होऊन तिच्यातील देवत्व प्रगट होत आहे’, असे जाणवले. 
१०. श्री महालक्ष्मीची विविध रूपे कार्यरत होऊन त्यांनी साधकांना विविध आशीर्वाद देणे
     महालक्ष्मीची रूपे कार्यरत झाली, तसेच श्री महालक्ष्मीच्या अष्टलक्ष्मी रूपांनी साधकांना अलक्ष्मी परिहार, पूरक लक्ष्मीची, म्हणजे सुलक्ष्मीची प्राप्ती, सुख आणि समृद्धी, तसेच इच्छित फळाची प्राप्ती होण्याचा आशीर्वाद दिला. 
११. समष्टी साधनेसाठी आवश्यक असणारे भौतिक 
ऐश्‍वर्यही प्राप्त होण्याचा आशीर्वाद लक्ष्मी आणि कुबेर यांनी साधकांना देणे
      गुणरूपी संपदा प्राप्त होऊन त्याची वृद्धी होण्याचा आशीर्वाद लक्ष्मी आणि कुबेर यांनी साधकांना दिला. आध्यात्मिक ऐश्‍वर्यासह समष्टी साधनेसाठी आवश्यक असणारे भौतिक ऐश्‍वर्यही प्राप्त व्हावे, असा आशीर्वाद साधकांना प्राप्त झाला. 
१२. श्रीमहालक्ष्मीला पंचामृताने स्नान घातल्यावर तिच्यातील तारक तत्त्व जागृत होणे
    श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घातल्यावर मूर्तीतील श्री महालक्ष्मीदेवीचे तारक तत्त्व अधिक प्रमाणात जागृत होऊन कार्यरत झाले.
१३. श्‍वेत पद्मामध्ये विराजमान असणार्‍या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन होणे
   अभिषेकाच्या वेळी श्‍वेत पद्मामध्ये अष्टपाकळ्या बाजूला सारून प्रक्षेपित होणार्‍या सोनेरी रंगाच्या प्रकाशझोतातून स्वर्णलक्ष्मीचे दर्शन झाले. तिने साधकांकडे पाहून स्मित केले आणि आशीर्वाद दिला. (प्रत्यक्षात पूजेत ठेवलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे जवळून छायाचित्र काढल्यावर छायाचित्रात देवी स्मित करतांना स्पष्टपणे दिसले.)
१४. अष्टलक्ष्मींचे दर्शन होणे
       गुलाबी रंगाच्या अष्टकमळांमध्ये बसलेल्या अष्टलक्ष्मींनी प्रसन्न होऊन साधकांना आशीर्वाद दिला. 
१४ अ. पूजनाच्या ठिकाणी कार्यरत झालेल्या श्री लक्ष्मीदेवीची गुणवैशिष्ट्ये 
- कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (३०.१०.२०१६, रात्री ९.४५)
१५. भावपूर्ण मंत्रोच्चारामुळे झालेला सकारात्मक परिणाम
     पुरोहित वेदमंत्रांचे भावपूर्ण उच्चारण करत असल्याने श्री लक्ष्मीदेवीच्या मूर्तीतील ईश्‍वरी चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता वृद्धींगत झाली. त्याप्रमाणे वातावरण भावपूर्ण होऊन आनंदाच्या लहरी वातावरणात कार्यरत झाल्याचे जाणवले. 
१६. देवीच्या मूर्तीला फुले आणि पत्री वाहिल्याने देवीची तारक शक्ती कार्यरत होणे
     देवीच्या मूर्तीला फुले आणि पत्री वाहिल्यावर देवीच्या मूर्तीमध्ये असणारी तारक शक्ती कार्यरत होऊन फुले अन् पत्री यांमध्ये आकृष्ट होऊन त्यांच्या माध्यमातून वातावरणात प्रक्षेपित होऊ लागली. 
१७. कापूर-आरतीने ओवाळतांना संबंधित देवतांच्या 
संबंधित लोकातील सूक्ष्म रूपाला ओवाळल्याचे जाणवणे
    पूजन केलेल्या श्री लक्ष्मीदेवीची मूर्ती आणि कुबेराची प्रतिमा यांना कापूर-आरतीने ओवाळत असतांना अलकापुरीमध्ये स्थित असणारे श्री कुबेराचे सूक्ष्म रूप आणि श्रीविष्णुलोकात श्रीविष्णूच्या चरणांशी वास करणार्‍या लक्ष्मीदेवीचे सूक्ष्म रूप यांना कापराच्या आरतीने ओवाळले जात असल्याचे जाणवले.
१८. मंत्रपुष्पांजली
     मंत्रपुष्पांजली चालू असतांना स्वर्गलोकातील देवता आणि ब्रह्मांडातील ऋषीमुनी कमलदलात विराजमान झालेल्या श्री महालक्ष्मीदेवीवर सुवर्णपुष्पांची वृष्टी करतांनाचे दृश्य दिसले. 
१९. समुद्रदेवता साधकांवर प्रसन्न होणे
     सिंधुसुजाता श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केल्यामुळे रत्नाकर समुद्रदेव साधकांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी साधकांना अभयदान दिले. 
२०. पुरोहितांनी श्री महालक्ष्मीदेवीला प्रार्थना केल्यावर तिने आशीर्वाद देणे
     रूप, पुत्र, धन, धान्य, आरोग्य यांच्या प्राप्तीसाठी पुरोहितांनी श्री महालक्ष्मीदेवीला प्रार्थना केल्यावर तिने आशीर्वाद दिला. (तेव्हा मूर्तीच्या उजव्या हातामध्ये सूक्ष्म-हालचाल होतांना जाणवली.) 
२१. साधकांच्या वतीने संतांनी वाहिलेली फुले देवीने स्वीकारणे
     पू. पद्माकर होनपकाका आणि पू. जयराम जोशीआजोबा (पू. आबा) यांनी साधकांच्या वतीने देवीला वाहिलेले फूल देवीने आनंदाने स्वीकारले.
२२. सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी देवीला वाहिलेले फूल देवीने आनंदाने स्वीकारून स्वतःच्या केसांत माळल्याचे जाणवले.’ - कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१०.२०१६, रात्री १०) 
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn