Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गर्भपाताच्या गुन्ह्याला क्षमा करण्याचापाद्य्रांकडील अधिकार कायम रहाणार ! - पोप फ्रान्सिस

    ज्या प्रमाणे कर्मे असतात, तसे त्यांचे फळ या जन्मात किंवा पुढच्या जन्मांत भोगायला मिळत असतात, यात ईश्‍वरही हस्तक्षेप करत नाही; मात्र साधना केली, तर ईश्‍वर मिळणार्‍या त्रासाची तीव्रता न्यून करतो किंवा ते भोगण्याची शक्ती देतो, असे हिंदु धर्मशास्त्र आहे. ख्रिस्त्यांचे अनेक पाद्री लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अपकीर्त झालेले आहेत, अशांना एखाद्याच्या गुन्ह्यासाठी अपराध्याला क्षमा करण्याचा अधिकार कसा असेल ?
     नवी देहली - गर्भपाताच्या गुन्ह्याला क्षमा करण्याचा कॅथलिक पाद्य्रांकडे असलेला अधिकार तसाच कायम रहाणार आहे, असे स्पष्टीकरण पोप फ्रान्सिस यांनी केले आहे. हा अधिकार अनिश्‍चित काळासाठी वाढवण्यात आल्याचे पत्र पोप यांनी प्रसारित केले आहे.
     या पत्रात पोप लिहितात, वास्तविक मीही गर्भपाताला पाप समजतो; कारण त्याद्वारे एका निष्पाप जिवाला समाप्त केले जाते. मी हेही सांगू इच्छितो की, जगात असे कोणतेही पाप नाही की, पश्‍चात्ताप झाल्यावर ईश्‍वर त्याला क्षमा करत नाही. मी अशा अनेक महिलांना ओळखतो, ज्या गर्भपातानंतर पाश्‍चात्तापाला मनात दाबून जीवन जगत असतात. यामुळेच पाद्री क्षमा मागण्याच्या एका यात्रेमध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतात. यासाठी मी गर्भपातासारखे पाप करणार्‍यांना दोषमुक्त करण्याचा अधिकार पाद्य्रांना देत आहे. 
     पाद्य्रांना हा विशेषाधिकार गेल्या वर्षी ८ डिसेंबरला इयर ऑफ मर्सीच्या वेळी देण्यात आला होता. हा अधिकार त्यांना एका वर्षासाठी देण्यात आला होता. त्याची मुदत २० नोव्हेंबरला समाप्त झाली होती. आता पोप फ्रान्सिस यांच्या या पत्राने तो अधिकार अनिश्‍चित काळासाठी वाढवण्यात आला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn