Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सहनशील वृत्तीची आणि स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देणारी ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अकोला येथील चि. राधिका रामेश्‍वर पवार (वय पावणेदोन वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र
चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. राधिका रामेश्‍वर पवार एक दैवी बालक आहे !
चि. राधिका पवार
पालकांनो, हे लक्षात घ्या ! 
     ‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अकोला येथील चि. राधिका रामेश्‍वर पवार हिचा कार्तिक कृष्ण सप्तमी (२० नोव्हेंबर २०१६ या दिवशी) दुसरा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. जन्मापूर्वी 
१ अ. सकारात्मक रहाणे आणि नामजप करणे : ‘गर्भधारणा झाली असल्याचे समजल्यावर ‘सकारात्मक राहायचे’, असे मी स्वतःच्या मनाशी ठरवले होते. त्या कालावधीत मी रामरक्षास्तोत्र आणि प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकत होते, तसेच पोटावर हात ठेवून ‘श्री गुरुदेव दत्त’ आणि श्रीकृष्ण यांचा नामजप करत होते. 
१ आ. बाळासाठी प्रार्थना करणे : देवाला माझ्याकडून ‘होणार्‍या बाळाला ‘देवाची आणि साधनेची ओढ असावी, त्याचे आरोग्य चांगले असावे अन् बाळ हुशार असावे’, अशी प्रार्थना होत होती. अत्तर आणि कापूर यांचे आध्यात्मिक उपाय करतांनाही ‘या उपायांतील चैतन्य बाळाला मिळू दे’, अशी देवाला प्रार्थना होत असे. सहाव्या मासात आधुनिक वैद्यांनी माझी पडताळणी केल्यावर ‘‘बाळाचे ठोके ऐकायला येत नाहीत’’, असे सांगितले. त्या वेळी देवाला आतून प्रार्थना झाली, ‘हे सगळे तुझेच नियोजन आहे. तुला अपेक्षित असे होऊ दे.’ या काळात गायत्री गर्भसंस्कार आणि विष्णु सहस्रनाम यांचे पठण केले. 
१ इ. सात्त्विक ग्रंथांचे वाचन करणे : मला ग्रंथ वाचनाची आवड असल्याने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य आणि वैशिष्ट्ये’ आणि ‘प.पू. भक्तराज महाराज यांचे चरित्र’ या सनातनने प्रकाशित केलेल्या सात्त्विक ग्रंथांचे वाचन केले. 
२. शस्त्रकर्माद्वारे प्रसूती
     बाळ पोटात आडवे असल्याने आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करण्यास सांगितले. शस्त्रकर्म चालू असतांना माझा सतत गुरुदेवांचा धावा चालू होता.
३. जन्मानंतर 
३ अ. तेजस्वी आणि गोंडस बाळ : बाळाचा जन्म झाल्यावर आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘तुझी मुलगी पुष्कळ गोड आणि गोंडस आहे.’’ बाळ रुग्णालयातील इतर बाळांपेक्षा अधिक तेजस्वी दिसायचे. 
३ आ. सुदृढ : बाळ २ मासांचे असतांना ‘ते ५-६ मासांचे आहे’, असे वाटायचे. 
३ इ. सहनशील : राधिका पुष्कळ सहनशील आहे. दोन मासांची असतांना तिला ताप येऊन कांजिण्या झाल्या होत्या. त्या वेळी त्रासाच्या मानाने तिचे रडण्याचे प्रमाण अल्प होते. नऊ मासांची असतांना राधिकाच्या पायाला तार लागली होती आणि थोडे रक्तही आले होते. त्या वेळी ती रडली नाही. माझ्याकडे येऊन तिने मला ‘बघ, मला बाऊ झाला आहे’, असे म्हणून लागल्याचे दाखवले. 
३ ई. काम करण्याची आवड : मला काम करतांना बघून ती तशी कृती करण्याचा प्रयत्न करते, उदा. घर झाडण्याचा आणि रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते. 
३ उ. आनंदी : राधिका सतत आनंदी असते. तिला पाहून इतरांनाही आनंद मिळतो. ती स्वभावाने शांत आहे. आंघोळ घालतांना, मर्दन (मालीश) करतांना, तसेच झोपेतून उठल्यावर ती कधीच रडत नाही.
३ ऊ. देवाविषयी ओढ : एकदा माझ्या सासूबाईंनी तिला ‘‘देवाला नमस्कार कर’’, असे सांगितल्यावर तिने देवाला साष्टांग नमस्कार केला. पूजा करतांना ती मांडीवर येऊन बसते आणि आरतीच्या वेळी टाळ्या वाजवते. तिला कुंकू लावायला पुष्कळ आवडते. झोपेत असतांना राधिकाने हाताच्या मुद्रा केलेल्या असायच्या.
३ ए. यज्ञाच्या वेळी शांतपणे बसणे : तिच्या पहिल्या वाढदिवसाला तिला गायत्रीमातेच्या मंदिरात नेले होते. त्या वेळी तेथे होम होणार होता. तेथील महाराज म्हणाले, ‘‘ही शांत बसेल का ?’’ आश्‍चर्य म्हणजे यज्ञ पूर्ण होईपर्यंत राधिका शांत बसली होती. 
     हे श्रीकृष्णा, ‘तू मला गुण पहाण्याची दृष्टी दिलीस. त्यामुळे राधिकाचे हे गुण लक्षात आले. त्यासाठी तुझ्या चरणी कृतज्ञता !’ 
- सौ. संजना रामेश्‍वर पवार (चि. राधिकाची आई), अकोला (मे २०१६)
     यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn