Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नोटाबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ रा.स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक पद्मकुमार माकपमध्ये प्रवेश करणार !

         एखाद्याने गाय मारली म्हणून आपण वासरू मारणार, अशा प्रकारचा निर्णय घेणारे संघाचे ज्येष्ठ प्रचारक ! माकपचा इतिहास पाहिला, तर नोटाबंदीमुळे होणार्‍या त्रासापेक्षा सहस्रो पटींनी जनेतला, विशेषतः हिंदूंना त्रास देण्याचे कार्य त्यांनी केले आहे, हे पद्मकुमार यांना लक्षात का येत नाही ?
         थिरुवनंतपुरम् (केरळ) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते पद्मकुमार यांनीकेंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाच्या निषेधार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा एका पत्रकार परिषदेत केली. गेल्या ४२ वर्षांपासून ते संघात सक्रिय होते आणि विविध पदांवर त्यांनी काम केले. पद्मकुमार म्हणाले की, नोटाबंदीच्या निर्णयाने मला धक्का बसला. या निर्णयाने मी हताश झालो आहे. या निर्णयामुळे सामान्यांची मोठी गळचेपी झाली. वयाच्या १० व्या वर्षांपासून संघाचे काम करत आहोत; परंतु प्रथमच माझ्या पदरी निराशा पडली आहे. नोटाबंदीने केरळातील नागरिकांची होत असलेली घुसमट मी पहात आहे. ते सहन करण्यापलीकडचे आहे. त्यामुळे मला माकपमध्ये जाण्याची इच्छा आहे. मागील चुकांसाठी मी क्षमा मागतो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn