Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मुंबईत गेल्या ५ वर्षांमध्ये २ सहस्र २८४ बलात्कार, तर ६ सहस्र ३७६ विनयभंग यांच्या घटनांची नोंद

देशाची आर्थिक राजधानीच असुरक्षित असेल, तर राज्याची स्थिती किती विदारक असेल ?
महिलांना सुरक्षित जीवन जगण्यासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) आवश्यक !
मुंबई बलात्काराची राजधानी !
     मुंबई - गेल्या ५ वर्षांमध्ये मुंबईत २ सहस्र २८४ बलात्कार, तर ६ सहस्र ३७६ विनयभंग यांच्या घटनांची नोंद झाली. गंभीर म्हणजे १८ वर्षांच्या आतील पीडितांचे प्रमाण सर्वाधिक असून वर्ष २०१५ मध्ये बलात्काराच्या नोंद झालेल्या घटनांमध्ये ते ६३ टक्के आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे हे भीषण वास्तव ‘प्रजा फाऊंडेशन’च्या वतीने प्रतिवर्षी सादर करण्यात येत असलेल्या अहवालातून दिसून येत आहे. ही आकडेवारी माहिती अधिकारातून मिळवलेल्या माहितीवरून देण्यात आली आहे. (राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण न्यून झाले आहे, असे सांगून स्वतःची पाठ थोपटणार्‍या पोलीस महासंचालकांना यावर काय म्हणायचे आहे ? - संपादक)
फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त निताई मेहता यांनी सांगितले की,
१. यंदा प्रकाशित केलेल्या आकडेवारीत मुंबईतील वाढणार्‍या या गंभीर समस्येवर महाराष्ट्र शासन आणि पोलीस यांनी तात्काळ पावले उचलावीत. 
२. बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये तक्रार प्रविष्ट केल्यानंतर आरोपपत्र प्रविष्ट होईपर्यंत ९ मास २ दिवस, तर सत्र न्यायालयांत निर्णयासाठी प्रकरण पोचेपर्यंत २१ मास ३ दिवस लागतात. (पोलिसांच्या कार्यक्षमतेचे खरे स्वरूप ! पोलिसांची कार्यक्षमता वाढणे आणि आरोपींना कठोर शासन मिळण्यासाठीची प्रक्रिया गतिमान करणे, यांसाठी राज्य सरकार कोणती ठोस पावले उचलणार आहे ? - संपादक) 
अहवालातून समोर आलेले भीषण वास्तव 
     उत्तर मध्य मुंबईमध्ये ९ सहस्र २८६ इतक्या सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे. (गुन्हेगारांचे नंदनवन बनलेले उत्तर मध्य मुंबई ! - संपादक) या भागाचे प्रतिनिधित्व करणार्‍या आमदारांनी २०१५-१६ या वर्षात गुन्ह्यांसंबंधी फक्त ६० प्रश्‍न विचारले. (यावरून लोकप्रतिनिधींना जनतेच्या सुरक्षेची किती काळजी आहे, हेच दिसून येते ! - संपादक)
       मुंबई पोलिसांत ११ टक्के तपास अधिकारी, तर ५७ टक्के नियंत्रणकक्ष कर्मचारी यांचा तुटवडा आहे. वर्ष २०११-१२ ते २०१५-१६ या ५ आर्थिक वर्षांच्या काळात महिलांवरील बलात्काराच्या घटना उत्तरोत्तर वाढत गेल्या आहेत. 
      याच ५ वर्षांमध्ये विनयभंगाच्या घटना अनुक्रमे ५५४, ७९३, १ सहस्र २०९, १ सहस्र ६७५ आणि २ सहस्र १४५ अशा घडल्या आहेत.
     वर्ष २०१४ मध्ये लहान मुलांवरील बलात्काराच्या ६०९ घटना (प्रमाण ५६ टक्के), वर्ष २०१५ मध्ये ७१२ घटना (प्रमाण ६३ टक्के) झाल्याची नोंद आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn