Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अवैध मंदिरांवरील कारवाई थांबवण्यासाठी राज्य सरकारने पुनर्निरीक्षण याचिका प्रविष्ट करावी ! - श्री. मिलिंद एकबोटे

पुण्यातील अवैध मंदिरे पाडल्याचे प्रकरण
        पुणे, २८ नोव्हेंबर (वार्ता.) - गेल्या काही दिवसांत येथील कर्वेनगर भागातील काही मंदिरे अवैध म्हणून पाडण्यात आली. सरकारने प्रशासनाकडील अवैध मंदिरांच्या यादीचे पुन्हा एकदा निरीक्षण करावे. त्यासाठी सरकारने मंदिर पाडण्याचे अवैध प्रकार थांबवावेत. जशी अवैध घरे अथवा झोपड्या नियमित करता येतात, तशी मंदिरे नियमित करण्यासाठी शासनाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्निरीक्षण याचिका प्रविष्ट करावी, असे प्रतिपादन समस्त हिंदू आघाडीचे श्री. मिलिंद एकबोटे यांनी केले. येथील पत्रकार भवनमध्ये २५ नोव्हेंबर या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जय हिंदुराष्ट्र समूहाचे अध्यक्ष सचिन वाडकर हे उपस्थित होते.
या वेळी श्री. मिलिंद एकबोटे यांनी मांडलेली सूत्रे -
१. औरंगजेबाने जेवढी मंदिरे पाडली नसतील, त्यापेक्षा अधिक मंदिरे सध्या प्रशासन पाडत आहे. अवैध मंदिरे म्हणून प्रशासनाने जी सूची सिद्ध केली आहे, त्यामध्ये वर्ष २००९ पूर्वीही बांधण्यात आलेल्या मंदिरांची सूची करण्यात आली आहे. तसेच त्यात अनेक पुरातन अशा मंदिरांचाही समावेश आहे.
२. सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २००९ मध्ये दिलेल्या निर्णयाची कार्यवाही प्रशासन आता करत असून त्याद्वारे राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न चालू आहे. तसेच हिंदु मंदिरे पाडून आताच्या राज्य सरकारला कलंकित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
३. प्रशासनाकडून कारवाई करतांना न्यायालयाने दिलेला निर्णय आणि राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत नाही. त्या आदेशानुसार मंदिरे पाडण्यापूर्वी स्थानिक नागरिकांशी चर्चा करणे, मंदिरांना नोटीस देणे, ठराविक एक दिवस जाहीर करून सर्वांसमक्ष त्या मंदिरावर कारवाई करणे, या सर्व गोष्टी धाब्यावर बसवून प्रशासन रात्री-अपरात्री कारवाई करत आहे.
४. पुण्यामध्ये अनेक भागांमध्ये अवैधरित्या मशिदी उभारण्यात आल्या असून त्यांच्यावर न्यायालयाच्या निर्णयानुसार कारवाई केली जातांना दिसत नाही. प्रशासन त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असून प्रशासनाचा हा भित्रेपणा आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn