Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) टिपूने देशासाठी प्राणांची आहुती दिली !

  • लक्षावधी हिंदूंची हत्या करणार्‍या, हिंदूंचेे बलपूर्वक धर्मांतर करून छळ करणार्‍या, हिंदु स्त्रियांना मुसलमानांत वाटण्याचे आदेश देऊन त्यांच्यावर बलात्कार करायला लावणार्‍या टिपू सुलतान(सैतान) याला महापुरुष बनवणारे श्रीपाल सबनीस यांच्यासारखे साहित्यिक कशा प्रकारचे साहित्य लिहीत असतील, याचा विचारच न केलेला बरा !
  • क्रूरकर्मा टिपू सुलतानचे वंशज असल्याप्रमाणे त्याचे गोडवे गाणारे श्रीपाल सबनीस यांची बौद्धिक दिवाळखोरी !
        सोलापूर - टिपूने दलित मुक्ततेचा नारा दिला. तो स्वदेशी भक्त होता. त्याने अनेक कारखाने उभे केले, लोकशाही भारतीय संस्कृती जिवंत ठेवली. विद्यापीठ उभे करून शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोचवली. कोणाला बलपूर्वक धर्मांतर करून घेतले नाही. बालसुधार, गृहस्त्रीसंरक्षण गृह उभे केले. सिंचन व्यवस्था उभी केली. शेतकर्‍यांसह सर्व कष्टकर्‍यांना भरघोस साहाय्य केले. ब्रिटिशांना सळो कि पळो केले. देशासाठी प्राणाची आहुती दिली. तो शहीद झाल्यानंतर मात्र भारताच्या स्वातंत्र्यावर गदा आली. भारतीय एकतेला अबाधित ठेवण्याचे काम टिपू सुलतान याने केले, असे हिंदुद्वेषी फुत्कार साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी काढत आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवून दिली. (टिपूच्या दैत्यासारख्या क्रूर छळामुळे सहस्रो हिंदु स्त्री-पुरुषांनी कृष्णा तुंगभद्रा नदीत जीव दिला. त्यांची प्रेते खाऊन कोल्हे आणि कुत्रे कंटाळले. त्याच्या आदेशाच्या भीतीने एका रात्रीत ५० सहस्र हिंदू मुसलमान झाले. 
       अशा क्रूर टिपूविषयी सत्याचा अपलाप करून धादांत खोटी माहिती पसरवणारेे सबनीसांसारखे इतिहासद्रोही हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष होतात, हे मराठीजनांचे महादुर्दैवच ! - संपादक) प्रा. डॉ. ई.जा. तांबोळी लिखित स्वातंत्र्याचा महानायक टिपू सुलतान चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा १९ नोव्हेंबरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबीनस यांच्या हस्ते पार पडला. त्या वेळी समस्त हिंदूंच्या भावना दुखावणारे असे हिंदुद्वेषी फुत्कार सबनीस यांनी काढले.
(म्हणे) हिंदु इतिहासकारांनी मुसलमान 
स्वातंत्र्यसैनिकांचा चेहरा लपवला !
        हिंदु इतिहासकारांनी मुसलमान स्वातंत्र्यसैनिकांचा चेहरा लपवला; म्हणून आपल्यासमोर आज ते चेहरे दिसत नाहीत. खरा इतिहास समोर आणण्याची आवश्यकता आहे. धर्माच्या भिंती ओलांडून पहाण्याची आवश्यकता आहे. (हिंदु इतिहासकार म्हणजे काही फोडा आणि झोडा राजकारण करणारे इंग्रज नव्हेत. हिंदु इतिहासकारांनी सत्य तेच लिहिले आहे. त्यांनी लिहिलेले सत्य स्वीकारण्याची सिद्धता सबनीस आणि धर्मांध यांची नसल्यानेच आता अशा प्रकारे ते खोटा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत ! - संपादक) 
सबनीस यांची हिंदुद्वेषी 
आणि मुसलमानप्रेमी वक्तव्ये !
१. सर्व प्रेषितांनी मानवता पसरवली; मात्र त्यांच्या अंध अनुयायांनी नष्ट केली. (हे सबनीस मुसलमानांच्या सभांमध्ये जाऊन का सांगत नाहीत ? - संपादक)
२. सर्व मुसलमान देशद्रोही नाहीत आणि सर्व हिंदू देशभक्त नाहीत. एका व्यक्तीवरून समाजाला नावे ठेवणे उचित नाही. (पकडलेले बहुतांश आतंकवादी हे धर्मांधच असतात, हे सबनीस का सांगत नाहीत ? - संपादक)
        या वेळी अ. लतीफ नल्लामंदू, अधिवक्ता बेरिया जाहिदअली खान, अयाज जुनेदी आदी उपस्थित होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn