Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

खांडवा (मध्यप्रदेश) येथे सिमीच्या आतंकवाद्यांच्या कबरीवर शहीद लिहिलेला शिलालेख काढला !

शिलालेख पुन्हा लावला जाणार 
नाही, यासाठी पोलीस आणि प्रशासन काय 
काळजी घेणार आहे, हे त्यांनी सांगितले पाहिजे !
         खांडवा (मध्यप्रदेश) - येथे सिमीच्या ५ आतंकवाद्यांच्या कबरीवर धर्मांधांकडून शहीद म्हणून लावण्यात आलेला शिलालेख हटवण्यात आला आहे. भोपाळ येथील कारागृहातून काही आठवड्यांपूर्वी ८ आतंकवाद्यांनी पलायन केले होते. त्यांना काही घंट्यातच पोलिसांनी चकमकीत ठार केले होते. त्यातील ५ आतंकवादी खांडवा येथील होते. त्यांचे मृतदेह येथे दफन करण्यात आले होते; मात्र काही धर्माधांनी त्यांची कबर बांधून तेथे ते शहीद असल्याचा उल्लेख करणारा शिलालेख लावला होता. याविषयीच्या तक्रारीनंतर प्रशासनाने प्रथम त्यावर चुना लावून लपवण्याचा प्रयत्न केला; मात्र दुसर्‍या दिवशी धर्मांधांनी चुना काढून टाकला होता. (शिलालेखावर चुना का लावण्यात आला ? तो पहिल्यांदाच का हटवण्यात आला नाही ? - संपादक) हे लक्षात आल्यावर प्रशासनाने मुसलमान धर्मगुरु आणि आतंकवाद्यांचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत हा शिलालेख हटवला. (प्रशासनाने थेट कारवाई करून तो का हटवला नाही ? धर्मगुरु आणि नातेवाईक यांना बोलावण्यामागे काय उद्देश होता, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे ! - संपादक) शिलालेख लावण्याच्या प्रकाराची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. (कबरीवर शिलालेख कोणी लावला हे शोधण्यासाठीही काही दिवस घेणारे पोलीस आतंकवाद्यांना कसे शोधणार ? - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn