Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मोपा विमानतळ हे गोव्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी मैलाचा दगड !

     मोपा, गोवा येथे विमानतळ प्रकल्प होत आहे. गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात होणारा हा प्रकल्प गोवा राज्य, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचा भाग ठरणारा आहे. 
२५ वर्षांनंतर मिळत आहे मोपा विमानतळाला मूर्त स्वरूप 
     १९९० वर्षीपासून या मोपा विमानतळ उभारणीसाठी प्रयत्न चालू आहेत. तब्बल २५ वर्षांनंतर याला मूर्त स्वरूप मिळणार आहे. हा विमानतळ प्रकल्प प्रारंभीपासून वादात सापडला होता. या विमानतळामुळे गोव्यात चालू असलेला दाबोळी विमानतळ बंद केला जाईल, अशी भीती दाखवून दक्षिण गोव्यातील राजकीय पुढारी आणि काही नेते या मोपा विमानतळाला तीव्र विरोध करत होते. आंदोलने केल्याने राजकीय स्वरूप प्राप्त झालेला हा विमानतळ प्रकल्प होणार कि नाही, याविषयी अनिश्‍चितता निर्माण झाली होती. यासाठी बांद्यातूनही आंदोलन झाले होते.
भाजप-मगो युती शासनाला प्रकल्पाला मूर्त रूप देण्यात यश 
    अखेर भाजप-मगो युती शासनाला या प्रकल्पाला पुढे नेण्यात यश आले आहे. बांदा शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर होणार्‍या या प्रकल्पासाठी बांद्याजवळील उगवे, मोपा या गावांबरोबरच वारखंड, कासारवर्णे, आंबेरे, चांदेल या गावांचा समावेश असून मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेकूळण हा मार्ग विमानतळापर्यंत जाणार आहे. या प्रकल्पामुळे गोव्याचा विकास होणारच आहे. त्याचबरोबर बांदा आणि पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे वाटचाल करणार आहे. मोपा विमानतळ गोव्यात असले, तरी त्या ठिकाणी उद्योगवाढीला मर्यादा आहेत. आवश्यक असलेली भूमी त्या ठिकाणी नसल्याने या ठिकाणच्या औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारी भूमी बांद्याजवळ असल्याने बांद्याचे महत्त्व वाढणार आहे. यामुळे बांद्यात रोजगार उपलब्ध होणार आहे यात शंका नाही. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन प्रकल्पांनाही चालना मिळणार आहे. 
      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या प्रकल्पाची पायाभरणी झाली. हा प्रकल्प म्हणजे गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रगतीतील मैलाचा दगड ठरणारा आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn