Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) बंदीला मी कायदेशीर उत्तर देईन !

डॉ. झाकीर नाईक यांचा कांगावा 
      नवी देहली - सरकारने मला बाजू मांडण्याची संधी न देताच माझ्यावर बंदी लादली आहे. या बंदीला मी कायदेशीर उत्तर देईन, असा कांगावा आतंकवादाला खतपाणी घालण्याचा आरोप असलेल्या कथित मुसलमान तत्त्वचिंतक डॉ. झाकीर नाईक यांनी केला आहे.
     डॉ. नाईक म्हणाले, सरकारकडून मला कोणतीही सूचना देण्यात आली नाही, तसेत कोणताही समन्स देण्यात आला नाही, तसेच मला माझी बाजू मांडण्यासाठी संपर्क करण्यात आला नाही. यासाठी मी प्रयत्न केला; परंतु त्याला कोणीही ऐकून घेतले नाही. 
      अलिकडेच डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेवर ५ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने आतंकवाद विरोधी कायद्याच्या अंतर्गत प्रतिबंधित इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून मुंबईतील फाऊंडेशनच्या १० ठिकाणी छापा टाकला होता. त्याचबरोबर या संघटनेची सर्व बँक खातीही गोठवण्याचा निर्देश राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिला होता.धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn