Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देशात १० लाख कोटी रुपयांचा काळा पैसा ! - योगऋषी रामदेवबाबा

     सोनीपत (हरियाणा) - देशात १० लाख कोटी रुपयांचा काळा पैसा आहे. हा पैसा बाहेर आला, तर देशाची अर्थव्यवस्था चीनपेक्षाही मोठी होईल आणि येत्या ५-७ वर्षांत अमेरिकेलाही आपण मागे टाकू, असा दावा योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केला. देशातच एवढा पैसा आहे की, परदेशी गुंतवणुकीची आपल्याला आवश्यकताच रहाणार नाही. आपल्या चलनातील रुपयाचे मूल्य डॉलरसारखे होऊ शकेल, असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

योगऋषी रामदेवबाबा पुढे म्हणाले की,
१. आतंकवाद, नक्षलवाद, अमली पदार्थ माफियांसह अनेक देशविरोधी शक्तींशी मोदी यांनी शत्रूत्व घेतले आहे. अर्थव्यवस्थेतील बड्या राक्षसांविरुद्ध त्यांनी युद्ध छेडले आहे. अशावेळी त्यांनी नोटा बंदीच्या घेतलेल्या निर्णयास देशवासियांनी पाठिंबा देणे आवश्यक आहे. (जनतेने पाठिंबा दिला आहेच, सरकारने अधिक कार्यक्षमतेने आणि नियोजनपूर्वक काम करून जनतेला होणारा त्रास दूर करावा, अशीच त्यांची अपेक्षा आहे ! - संपादक) २. देशात ५० सहस्रांहून अधिक ज्योतिषी असतांनाही एकालाही ५०० आणि १ सहस्रच्या नोटा बंद होणार असल्याचे जाणवले नाही. त्यामुळे मोदी यांनी नोटा बंदी करतांना ज्योतिषांचेही पितळ उघडे पाडले आहे. त्यामुळे जनतेने मंत्र-तंत्रापेक्षा कर्मयोग सिद्धांतावर विश्‍वास ठेवावा. (दाते पंचांगामध्ये या काळात सरकार मोठा निर्णय घेणार, असे नमूद केले आहे. योगऋषी रामदेवबाबा ज्या भारतीय संस्कृतीवर श्रद्धा ठेवतात, त्याच संस्कृतीतून ज्योतिषशास्त्र निर्माण झाले आहे.त्यामुळे ज्योतिषांना हिणवणे योग्य नाही, असेच हिंदुत्वनिष्ठांना वाटते. तसेच काही ज्योतिषांना हे लक्षात आलेही असेल; मात्र देशहितासाठी त्यांनी ते उघड केले नसेल, असेही असू शकते. ज्योतिषांनी ते उघड केले असते, तर मोदी यांनी ज्या हेतूने नोटा बंद केल्या, तो काळा पैसा आधीच घोटाळेबाजांनी पांढरा केला असता ! - संपादक)
३. मोदी यांच्यावर आरोप करतांना विरोधक त्यांना ‘परदेशातील काळा पैसा कधी आणणार ?’, असे विचारतात; पण मोदी यांनी आधी देशातील काळा पैसा बाहेर काढण्याला प्राधान्य दिले आहे. पहिले स्वतःचे घर (देश) स्वच्छ केल्यानंतर परदेशातीलही काळा पैसा बाहेर काढला जाणार आहे.
४. स्वित्झर्लंड देशाची सैनिकीशक्ती भारताच्या सैनिकीशक्तीच्या १० टक्केही नाही. त्यामुळे त्यांच्याकडील बँकांत भारतियांनी ठेवलेला पैसाही मोदी नक्कीच भारतात आणतील.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn