Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राज्यात स्त्री अत्याचाराच्या गुन्ह्यांत वाढ !

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचा गुन्हेविषयक अहवाल २०१५ 
तथाकथित पुरोगामी आणि स्त्री समानतेसाठी 
झटणार्‍या तृप्ती देसाई यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? 
वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे ! 
     पुणे, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - राज्यात स्त्री अत्याचाराचे गुन्हे वाढले असून वर्ष २०१५ मध्ये ३१ सहस्र १२६ गुन्हे प्रविष्ट झाले आहेत. त्याचसमवेत स्त्रियांवरील दखलपात्र गुन्ह्यांंच्या संख्येत वाढ झाली असली, तरी गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात ही वाढ झाली आहे. ते प्रमाण १९ टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. आर्थिक आणि सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. वर्ष २०१५ मध्ये राज्यात १३ सहस्र ७३३ आर्थिक गुन्हे, तर सायबरविषयीचे २ सहस्र १९५ सायबर गुन्हे प्रविष्ट झाले. अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी कृत्यातील सहभागही चिंताजनक आहे, अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचा गुन्हेविषयक अहवाल २०१५ यामधून पुढे आली आहे. (कायदा-सुव्यवस्था रसातळाला जाणे हे राज्यासाठी चिंताजनक ! ही स्थिती सुधारण्यासाठी राज्य शासन आणि पोलीस प्रशासन कोणते कठोर प्रयत्न करणार ? - संपादक

अहवालात उघड झालेली राज्याची भयावह स्थिती 
१. राज्यभरात ४ लाख २३ सहस्र गुन्हे प्रविष्ट झाले आहेत. 
२. स्त्रियांवरील अत्याचार, महिलांचे अपहरण, बलात्कार, विनयभंग आणि कौटुंबिक हिंसाचार, बालकांवरील अत्याचार, तसेच अनुसूचित जातींवरील अत्याचार यांत वाढ झाली आहे. स्त्रियांवरील अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे मुंबई शहरात ४ सहस्र ८०३ या संख्येने प्रविष्ट झाले आहेत. 
३. २ सहस्र ५०९ हत्यांचे गुन्हे प्रविष्ट झाले आहेत. दरोड्याचे सर्वाधिक गुन्हे नगर आणि पुणे जिल्ह्यांत प्रविष्ट आहेत. 
४. चोरीचे ६१ सहस्र १२८ गुन्हे प्रविष्ट झाले असून चोरीचे सर्वाधिक गुन्हे मुंबई शहरात प्रविष्ट आहेत. 
५. रस्ते अपघातात १३ सहस्र ६८५ जणांचा मृत्यू झाला असून राज्यात प्रत्येकी २ घंट्यांनी तिघांचा अपघाती मृत्यू होतो. 
६. सायबर गुन्ह्यांंमध्ये ८२५ आरोपींना अटक केली आहे. मुंबई शहरात ९७९ सायबर गुन्हे प्रविष्ट असून त्यानंतर ठाणे आणि संभाजीनगर शहरांमध्ये सायबर गुन्हे प्रविष्ट आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn