Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आरोप निश्‍चिती पुढे ढकलण्याचा केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचा अर्ज न्यायालयाने पुन्हा फेटाळला !

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण ! 
 यंत्रणेला शेवटची संधी देत पुढील सुनावणी ९ डिसेंबरला ! 
     पुणे, २८ नोव्हेंबर - डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सनातनचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावरील आरोप निश्‍चितीची सुनावणी ३ मास पुढे ढकलावी, असा विनंती अर्ज केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने न्यायालयात पुन्हा सादर केला. येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.वाय. लाडेकर यांनी हा अर्ज फेटाळून लावत आरोप निश्‍चितीची सुनावणी ९ डिसेंबर या दिवशी ठेवली. २८ नोव्हेंबर या दिवशी उपरोक्त प्रकरणाची सुनावणी झाली, त्या वेळी यंत्रणेचे शासकीय अधिवक्ता मनोज चालाडे, डॉ. तावडे यांचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि यंत्रणेचे अधिकारी एस्.आर्. सिंग उपस्थित होते. या सुनावणीला डॉ. तावडे यांनाही उपस्थित करण्यात आले होते. या पूर्वी २६ ऑक्टोबर, १६ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी आरोप निश्‍चितीची सुनावणी पुढे ढकलत असल्याच्या कारणावरून न्यायालयाने तपास यंत्रणेला अत्यंत कडक शब्दांत फटकारले होते.

 यंत्रणेच्या अधिवक्त्यांनी विनंती अर्ज सादर 
केल्यावर अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी त्याला 
जोरदार विरोध केला. या वेळी त्यांनी केलेला सडेतोड प्रतिवाद 
१. केंद्रीय अन्वेषण यंत्रणा हा खटला लांबवण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने बंदुकीच्या गोळ्यांचा अहवाल 'स्कॉटलंड यार्ड' येथून मागवण्यासाठी अनेक वेळा संधी दिली आहे. त्यानंतर पुणे येथील सुनावणी चालू असलेल्या न्यायालयानेही वारंवार संधी दिली आहे. 
२. त्याचसमवेत न्यायालयाने १६ नोव्हेंबर या दिवशी दिलेल्या आदेशावर यंत्रणा अद्यापपर्यंत उच्च न्यायालयात का गेली नाही ? उच्च न्यायालयाने 'तपास पारदर्शक असावा, न्याययंत्रणेवर विश्‍वास रहावा', असे म्हटले आहे. हा हक्क केवळ दाभोलकरांच्या नातेवाइकांचा नसून सर्वांचा आहे. तसेच तो डॉ. तावडे यांचाही आहे. 
३. १८ फेब्रुवारी या दिवशी कोल्हापूर पोलिसांकडून यंत्रणेने गोळ्या ताब्यात घेऊनही अद्यापपर्यंत अन्वेषण यंत्रणा काही करत नाही. त्यामुळे अन्वेषण यंत्रणा नेमका कोणता तपास करत आहे, यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn