Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विदेशात पळून गेलेल्या भारतियांना परत आणून त्यांच्यावर खटला चालवा ! - सर्वोच्च न्यायालय

कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी १०० जणांनी विदेशात पलायन करेपर्यंत 
प्रशासन काय करत होते ? त्यांना परत आणा, हेही न्यायालयाला का सांगावे लागते ?
     नवी देहली - कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी ज्या भारतियांनी परदेशात पलायन केले आहे, त्यांना पुन्हा भारतात आणून त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेत पाऊले उचलावीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. १०० हून अधिक भारतीय पलायन करून विदेशात स्थायिक झाले आहेत. या पलायनाविषयी न्या. जे.एस्. खेहर आणि न्या. अरुण मिश्रा यांनी चिंता व्यक्त केली आहे. या पलायनवाद्यांना न्यायालयासमोर उपस्थित करण्यात यावे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
     व्यावसायिक ललित मोदी, विजय माल्या यांसारखे अनेक जण कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी देश सोडून विदेशात पळून गेले आहेत. यासंदर्भात बोलतांना न्यायालय म्हणाले, गेल्या काही कालावधीपासून प्रत्येक जण कायदेशीर कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पलायन करत असल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे. अशा लोकांना देशात परत आणणे आवश्यक आहे. ज्यामुळे कायदा सर्वांसाठी सारखा आहे आणि कोणला सूट नाही, असा संदेश लोकांमध्ये जाईल.
व्यावसायिक हृतिका अवस्थी यांना परत आणण्याचे न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश
     भारतातून पलायन करून लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यावसायिक हृतिका अवस्थी यांनाही परत आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्व पर्याय वापरावेत, असा आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना लंडनमध्ये जाऊन त्यांच्या आजारी पतीला भेटण्याची अनुमती दिली होती; परंतु त्या पुन्हा परतल्या नाहीत. अवस्थी यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल आहे. त्यांनी कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी भारतात येण्यास नकार दिला होता. त्यांचा पासपोर्ट रहित करण्याचा न्यायालयाने आदेश दिला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn