Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आणखी ४ ते ५ मास देशात नोटांचा तुटवडा जाणवेल !

चलन समस्येला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी जनतेत राष्ट्रप्रेम निर्माण करणे 
आवश्यक आहे ! अशा राष्ट्रप्रेमी जनतेच्या बळावरच देशातील भ्रष्टाचार नष्ट करणे शक्य होईल !
बँक एम्प्लॉईज फेडरेशनची माहिती
     नवी देहली - देशातील चारही चलन निर्मिती केंद्रांनी पूर्ण क्षमेतेने नोटा सिद्ध करण्याचे काम केले तरीही बँकांना आवश्यक तेवढे चलन नजीकच्या काळात उपलब्ध होणे अवघड आहे. त्यामुळे आणखी ४ ते ५ महिने देशात नोटांचा तुटवडा जाणवेल, असे द बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर काही दिवसांनीच नोकरदार वर्गाचे वेतन जमा झाल्यावर बँकांच्या पुढील अडचणीत आणखीनच भर पडेल, असेही फेडरेशनने म्हटले आहे.
     बँक फेडरेशनचे सरचिटणीस पी.के. विश्‍वास म्हणाले, बँकांकडे पुरेशी रोकड नसल्यामुळेच लोकांमध्ये संताप आहे. ही समस्या सुटल्यावरच परिस्थिती सुरळीत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री अचानक ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जुन्या नोटा पालटण्यासाठी देशभरात लोकांचा एकच गोंधळ उडाला होता. या नवीन अडचणीमुळे तुर्तास बँकांसमोरील रांगा कायम राहील, असे चित्र दिसते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn