Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गंभीर आजारपणात अखंड अनुसंधानात आणि आनंदी राहून परिस्थितीवर मात करणारी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दीपाली मतकर !

कु. दीपाली मतकर
      ‘कु. दीपाली मतकर पुष्कळ आजारी असल्याचे कळल्यावर मला तिच्याजवळ रहाण्याची आणि तिला पहाण्याची तीव्र इच्छा झाली. नंतर मला सोलापूरला दीपालीच्या साहाय्यासाठी जाण्याची संधी मिळाली. ‘तिची भक्ती किती श्रेष्ठ आहे, पुष्कळ शारीरिक त्रास होत असतांनाही ती देवाशी कशी एकरूप होते’, हे शिकण्यासाठी देवाने मला तिथे पाठवल्याचे माझ्या लक्षात आले. रुग्णालयात गेल्यानंतर देवाने तिला केलेले साहाय्य, दीपालीसमवेत असतांना तिची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि प.पू. डॉक्टरांची अनुभवलेली प्रीती यांविषयी पुढे देत आहे. 
१. ‘दीपालीची सेवा करतांना ‘ती गुरुसेवा आहे’, या भावाने करून आनंद घ्यायचा आहे’, असे सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी सांगणे आणि त्यांनी सूक्ष्मातून दीपालीचे डोके अन् पाय चेपून देणे : कु. दीपालीकडे जातांना सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी मला सांगितले, ‘‘तुला दीपालीची सेवा ‘ती गुरुसेवा आहे’ या भावाने करून आनंद घ्यायचा आहे. त्या रुग्णालयात केवळ दोन गोपींचे अनुसंधान असणार आहे. त्यांचे विश्‍व असणार आहे आणि दीपाली बरी झाल्यावर तुम्ही दोघी लवकर रामनाथीला या. आम्ही वाट पहात आहोत.’’ सद्गुरु बिंदाताई रुग्णालयात सूक्ष्मातून जाऊन तिचे डोके आणि पाय दाबून द्यायच्या अन् तिच्या डोक्यावरून हात फिरवायच्या. त्या वेळी ‘तिला काय वेदना होत आहेत’, हे त्यांना कळायचे. 
कु. तृप्ती गावडे
२. दीपालीला प्रत्यक्षातही अखंड डोकेदुखी आणि पायांतून उष्णता बाहेर पडत असल्याने वेदना होत असल्याचे दिसणे आणि त्यामुळे ‘संतांचे कार्य कसे उच्च प्रतीचे असते’, ते अनुभवणे : २६.१०.२०१६ या दिवशी मी दीपालीला अतीदक्षता विभागात भेटले. त्या वेळी तिचे डोके खूप दुखत असल्याचे आणि पायांमधून उष्णता बाहेर पडत असल्याने तिला वेदना होत असलेल्या दिसल्या. त्या वेळी ‘संतांचे कार्य कसे उच्च प्रतीचे आणि सगळ्या स्तरांवर असते’, हे अनुभवायला मिळाले. सद्गुरु बिंदाताई अखंड सेवेत असतात. त्यांचा एकेक क्षण महत्त्वाचा असतो आणि त्या कितीतरी जलद गतीने सेवा क्षणात करत असतात. अशा व्यस्ततेत त्या लहान जिवांची सेवाही किती तत्परतेने करत असतात, ते अनुभवायला मिळाले. 
३. दीपालीच्या शरिराच्या हालचाली होत नसणे आणि श्‍वास घेता येत नसल्याने व्हेंटिलेटर लावणे अन् अशा स्थितीत सूक्ष्मातील आक्रमणे होऊन तिला छातीवर पुष्कळ दाब जाणवणे : त्या दिवशी दीपालीच्या शरिराच्या हालचाली होत नव्हत्या. ती केवळ पापण्यांची उघडझाप करायची. तिच्या डोळ्यांमध्येही अल्प प्रमाणात शक्ती जाणवून डोळे पांढरे वाटायचे. त्या वेळी तिला पलंगावर बसता येत नव्हते. तिला श्‍वास घेता येत नसल्याने व्हेंटिलेटर लावण्यात आला होता. तो काढल्यावर तिचा श्‍वास थांबायचा. ते पाहून मला भीती वाटायची. अशा तीव्र वेदनांमध्ये तिच्यावर सूक्ष्मातील आक्रमणेही होत असत. रात्रीच्या वेळी तिला छातीवर पुष्कळ दाब जाणवायचा. 
४. नाका-तोंडातून रक्त आलेले पाहून ‘हे शेवटचे क्षण आहेत’, असे दीपालीला कळणे, आधुनिक वैद्यांनीही ‘ती जिवंत राहील’, अशी आशा सोडणे अन् धन्वंतरी देवता तिला हाताळत असल्याचे जाणवणे : तिच्या नाका-तोंडातून रक्त यायचे आणि ते पाहिल्यावर तिला भीती वाटायची. तिला कळले होते, ‘नाकातून आणि तोंडातून रक्त येणे म्हणजे शेवटचे क्षण आहेत.’ तिची अशी स्थिती पाहून आधुनिक वैद्यांनी ‘ती जिवंत राहील’, ही आशा सोडली होती. प्रत्येक दिवशी ते तिची पडताळणी केल्यावर म्हणायचे, ‘‘उपचार चालू आहेत. प्रयत्न करूया.’’ त्यामुळे जिवात जीव नसायचा. मला त्या आधुनिक वैद्यांमध्ये देवाचे रूप दिसायचे. ‘धन्वंतरी देवता तिला हाताळत आहे’, अशी जाणीव असायची. 
५. दीपालीने कडू औषधे घेतांना ‘धन्वंतरी देवतेने तिच्यासाठी प्रसाद पाठवला आहे’, या भावाने आणि आनंदाने घेणे : दीपालीची औषधे अतिशय कडू होती. ती औषधे घेतांना ‘धन्वंतरी देवतेने तिच्यासाठी प्रसाद पाठवला आहे’, या भावाने आणि आनंदाने घ्यायची. एकदा आम्ही धन्वंतरी देवतेविषयी दोघीजणी बोलत असतांना ती तिथे आल्याचे जाणवले. दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात धन्वंतरी देवतेचे सुंदर चित्र आले होते. ते पाहून आम्हाला त्यात श्रीविष्णूचेही त्यात दर्शन झाले आणि कृतज्ञता वाटली.
६. रुग्णालयातील परिचारिकांनी सहजतेने आणि मोकळेपणाने बोलणे अन् आधुनिक वैद्यांनी ‘देव असतो का ?’ असे विचारून त्याविषयी दीपालीकडून समजून घेणे : रुग्णालयातील परिचारिका आमच्याशी सहजतेने आणि मोकळेपणाने बोलायच्या. दीपालीला अतीदक्षता कक्षातून बाहेर आणले, त्या दिवशी तेथील परिचारिकेने पुष्कळ आनंद व्यक्त केला. एक आधुनिक वैद्य दीपालीजवळ असलेल्या कृष्णाच्या चित्राकडे पाहून म्हणाले, ‘‘देव असतो का ?’’ त्या वेळी दीपालीने त्यांच्याशी बोलायला आरंभ केला. त्यावर ते म्हणाले, ‘‘थांबा, मी सगळ्या रुग्णांची पडताळणी करून येतो.’’ ते पुन्हा ऐकायला आल्यानंतर दीपालीने त्यांना ‘देव कसा असतो’, याविषयी सांगितले. एका रुग्णाने दीपालीकडे असणार्‍या कृष्णाचे त्याच्या भ्रमणभाषमध्ये छायाचित्र काढले. 
७. दीपालीचा पलंग इतर रुग्णांच्या पलंगापेक्षा वेगळा जाणवत असल्याचे परिचारिकेने सांगणे : एक परिचारिका आली आणि म्हणाली, ‘‘हा पलंग इतर रुग्णांच्या पलंगासारखा वाटत नाही, निराळा वाटतो. दीपालीच्या पलंगावर चैतन्य जाणवायचे. आणखी एक परिचारिका श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून म्हणाली, ‘‘तुम्ही किती भक्ती करता ?’’ 
८. दीपालीचे प्राण टिकवून ठेवणे, हे केवळ देवाच्या हातात असणे आणि देव-भक्ताचे नाते कसे असते, ते दीपालीकडे पाहून कळणे : दीपालीची मृत्यूशी झुंज पाहून आणि तिची स्थिती पाहून ‘देवाने दीपालीला पुनर्जन्म दिला आहे’, हे लक्षात यायचे. त्या वेळी एक लक्षात आले, ‘भक्ताची भक्ती श्रेष्ठ असेल आणि त्या भक्ताला काही झाले, तरी देव स्वतःचे आयुष्य त्याच्या भक्ताला देण्यास सिद्ध होतो.’ त्याचे प्रत्यक्ष उदाहरण कु. दीपाली मतकर आहे. ‘भक्ताचे आणि देवाचे नाते कसे असते’, हे मला प्रत्यक्ष पहायला मिळाले. दीपालीला प्राणांतिक वेदना होत असल्या, तरी तिचे मन श्रीकृष्णाकडेच होते. 
- कु. तृप्ती गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn