Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

उद्यापर्यंत थांबा, निर्णय कळेल ! - संजय राऊत, खासदार, शिवसेना

नोटबंदीमुळे नागरिकांना येणार्‍या अडचणींचे प्रकरण
     मुंबई - देशात आर्थिक अराजकता निर्माण झाली आहे. पाचशे आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित करणे, हा राजकीय विषय नसून, सव्वाशे कोटी जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. उद्यापर्यंत थांबा, निर्णय कळेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनी नोटबंदीच्या निर्णयामुळे नागरिकांना येणार्‍या अडचणींविषयी मत व्यक्त करतांना केले.
श्री. राऊत पुढे म्हणाले की,
१. या प्रश्‍नावर सर्वांचे दरवाजे ठोठावून जर जनतेला न्याय मिळणार असेल, तर त्यासाठी शिवसेनेची सिद्धता आहे.
२. ममता बॅनर्जींसमवेत उद्धवजींची चर्चा चालू आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर हा प्रकार सध्या चालू आहे. ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची लढाई नाही. ही जनतेची लढाई आहे.
३. ममता बॅनर्जींसोबत राष्ट्रपतींकडे जायला हरकत काय ? आम्ही मोदींच्या विरोधात नाही, तर जनतेच्या हितासाठी ममता बॅनर्जी यांच्यासोबत जाऊ शकतो.
४. जिल्हा बँकेवरची बंदी अन्यायकारक आहे. सर्वसामान्य शेतकर्‍यांचा पैसा जिल्हा बँकेत आहे. शेतकर्‍यांची अडवणूक कशासाठी ?
५. जिल्हा बँकेवरची बंदी उठवण्यासाठी पंतप्रधानांना निवेदन देण्याचे खासदारांना आदेश देण्यात आले असून स्वतः मुख्यमंत्र्यांशी याविषयी चर्चा करणार आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn