Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

घोटाळेबाज अंनिसवर बंदी घालण्याच्या संदर्भात अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांना निवेदन

श्री. गिरीश बापट (उजवीकडे) यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
     पुणे, २८ नोव्हेंबर (वार्ता.) - अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली समाजाला नास्तिकतेकडे नेणार्‍या अंनिसचा भ्रष्ट चेहरा सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, तसेच हिंदु विधीज्ञ परिषद यांनी उघडा पाडला होता. अंनिसविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींची नोंद घेत सातारा येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांनी चौकशी अहवालामध्ये अंनिसवरील आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे नमूद करून अंनिसवर प्रशासक नेमावा असे सूचित केले होते. नुकतेच केंद्रीय गृहमंत्रालयानेही अंनिसची एफ्सीआर्ए नोंदणी रहित केली होती. या पार्श्‍वभूमीवर घोटाळेबाज अंनिसची सखोल चौकशी करून बंदी घालण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन अन्न आणि नागरी पुरवठामंत्री, तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना देण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दीपक आगवणे आणि गजानन केसकर उपस्थित होते. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn