Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातनचे रामनाथी, मिरज आणि देवद येथील आश्रम हे अनुक्रमे विष्णुलोक, ब्रह्मलोक अन् शिवलोक असल्याचे जाणवणे

श्री. योगेश जोशी
१. रामनाथी आश्रम
रामनाथी आश्रम म्हणजे विष्णुलोक आहे; कारण महर्षींनी सांगितल्यानुसार येथे प्रत्यक्षात प.पू. डॉक्टरांच्या रूपात भगवान श्रीविष्णु विराजमान आहे आणि श्रीविष्णूचे कार्य काय, तर भक्तांचे पालनपोषण करून त्यांना मोक्षाला नेणे; त्याचप्रमाणे श्रीविष्णु रामनाथी आश्रमात साधकांचे पालनपोषण करून त्यांचा उद्धार करत आहे.
२. मिरज आश्रम
मिरज आश्रम म्हणजे ब्रह्मलोकच आहे, असे जाणवले. त्याचे कारण म्हणजे मिरज आश्रमात वर्ष २००३ मध्ये प.पू. डॉक्टरांचे सूक्ष्मातील कार्य चालू झाले. त्यामुळे ते अनिष्ट शक्तींच्या निर्मूलनाचे उत्पत्ती स्थान असल्याने खरोखर तो ब्रह्मलोकच आहे, असे वाटले.
३. देवद आश्रम
शिव हा देव लयाचे कार्य करतो. देवद आश्रमामध्ये वर्ष २००३ मध्ये प.पू. डॉक्टरांनी शुद्धीकरण सत्संग घेतले आणि तेथे साधकांमधील स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन, म्हणजे त्यांचा लय करायला आरंभ केला. त्यामुळे देवद आश्रम हा शिवलोक असल्याचे जाणवले.
- श्री. योगेश जोशी, सनातन आश्रम, मिरज. (२९.१०.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn