Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍या पुरुषांना नपुंसक करण्यात यावे ! - मीरा जॅसमिन, अभिनेत्री

बलात्कार्‍यांना केवळ नपुंसक केल्याने त्यांच्या मनातील तीव्र लैंगिक 
भावना नष्ट होणार नाहीत. ही समस्या सोडवण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण दिले 
पाहिजे. त्यामुळे समाज सद्वर्तनी बनेल आणि बलात्कारच नाही, तर इतरही गुन्हे घडणार नाहीत !
     कोच्चि (केरळ) - देशात महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍या पुरुषांना शिक्षा करण्यासाठी एकमात्र कठोर मार्ग म्हणजे त्यांना नपुंसक करण्यात यावे, असे प्रतिपादन दक्षिणात्य अभिनेत्री मीरा जॅसमिन यांनी केले आहे. त्यांनी प्रसिद्ध अभिनेते अनुप मेनन आणि अलीकडेच पेरूमबावूर येथे कथितपणे बलात्कार केल्यानंतर हत्या करण्यात आलेल्या एका दलित मुलीच्या आईच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेला संबोधित केले.
     अभिनेत्री जॅसमिन म्हणाल्या, ‘‘सध्याचे कायदे अशा गुन्ह्यांशी दोन हात करण्यास पुरेसे नाहीत. जे महिलांवर लैंगिक अत्याचार करतात, त्यांनाही यातनामय शिक्षा मिळाली पाहिजे. जर अशा लोकांना यातनामय शिक्षा देण्यात आली, तर ते त्यांच्या जीवनात कोणत्याही महिलेला हात लावण्याचे पुन्हा धाडस करणार नाहीत.’’धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn