Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

खारेगाव रस्त्यावर (ठाणे) १३ पट लाभ मिळवूनही ठेकेदारांकडून अद्याप पथकरवसुली चालूच

     ठाणे - खारेगाव रस्त्यावर जुन्या कशेळी पुलालगत ४ लेनसह दोन लेनचा पूल उभारून पथकरवसुली करणार्‍या मे.आयडीयल रोड बिल्डर्स या आस्थापनाने १३ पट लाभ मिळवूनही अद्याप पथकरवसुली चालूच ठेवली आहे. येथील श्री. चंद्रहास तावडे यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघडकीस आणली. या ठेकेदाराने पथकर वसुलीच्या कराराचा भंग केला असून शासनाचीही फसवणूक केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही टोलवसुली कायमची बंद करावी, यासाठी श्री. तावडे यांनी शासनाला निवेदन दिले आहे. (नागरिकांचे आर्थिक शोषण करणारी पथकरवसुली रहित करण्यासाठी मुख्यमंत्री लक्ष घालतील का ? गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय्य टोलधाड रहित करण्याची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून जनतेला चांगले दिवस दाखवावेत, ही अपेक्षा ! - संपादक)
माहिती अधिकारात उघड झालेली धक्कादायक माहिती

१. वर्ष १९९५ मध्ये जुन्या कशेळी पुलालगत २५.९२४ कि.मी.लांबीच्या रस्त्याचे बांधा-वापरा-हस्तांतरीत करा (बीओटी) तत्त्वावर १७ कोटींचे कंत्राट मे. आयडीयल आस्थापनाला देऊन खारेगाव रस्त्यावरील पथकरवसुलीचा परवाना देण्यात आला. १९९७ मध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर २००५ पर्यंत पथकर वसूल करण्यात येणार होता.
२. या संदर्भात वर्ष १९९८-९९ ते २००१ पर्यंत किती पथकरवसुली झाली याची माहितीच शासनाकडे उपलब्ध नसल्याची माहिती उघडकीस आली. (तत्कालीन सरकारचा अनागोंदी कारभार ! पथकर वसुलीवर लक्ष ठेवणारी यंत्रणा राज्यात अस्तित्वात आहे कि नाही ? - संपादक) जानेवारी २००१ पासून मार्च २००५ पर्यंत ६१ कोटी ४७ लाख ८१ सहस्र इतका पथकर वसूल झाल्याचे ठेकेदाराने शासनास कळवले.
३. या रस्त्याचे पुन:श्‍च नूतनीकरण करण्यासाठी सप्टेंबर १९९८ मध्ये दुसरा करार करून या कामाची किंमत ६९ कोटी ३० लाख इतकी ठरविण्यात आली. ही किंमत जून २०१७ पर्यंत पथकराद्वारे वसूल करायची होती. याप्रमाणे प्रकल्प किंमत एकत्रित केल्यास या रस्त्याच्या बांधकामासाठी एकूण ८६ कोटी ३१ लाख इतका खर्च कंत्राटदाराने केला. सदर दोन्ही करारानुसार एप्रिल २००५ ते सप्टेंबर २०१६ पर्यंत कंत्राटदाराने पथकराद्वारे ६१२ कोटी वसूल केले आहेत. म्हणजेच १६ वर्षात कंत्राटदाराने जवळजवळ १३ पट म्हणजेच एकूण ६७३ कोटी ४९ लाख इतका पथकर वाहनधारकांकडून वसूल केला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn