Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

८७ पतसंस्थांमधील १ सहस्र ४६५ जणांना गैरकारभाराप्रकरणी अटक !

 सहकारक्षेत्रात भ्रष्टाचाराची बजबजपुरी करणार्‍यांना कठोर शासन करा ! 
* ४६९ पतसंस्थांमध्ये गैरकारभार, २८९ पतसंस्था अडचणीत 
* सहाय्यक निबंधक, संचालक, लेखापरीक्षक आणि सनदी लेखापाल यांच्यावर फौजदारी गुन्हे 
     मुंबई - राज्यातील पतसंस्थांमध्ये गैरकारभार केल्याप्रकरणी ८७ पतसंस्थांमधील १ सहस्र ४६५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. राज्यातील एकूण ४६९ पतसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाला आहे. संस्थाचालकांच्या मनमानी कारभारामुळे त्यांतील २८९ नागरी सहकारी पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. या गैरकारभारावर सहाय्यक निबंधक, सनदी लेखापाल आणि लेखापरीक्षक यांनीही पांघरूण घातले आहे. त्यामुळे सहकार खात्याने, ५ साहाय्यक निबंधक, २ सहस्र ६१५ संचालकांसह १०४ लेखापरीक्षक आणि ४७ सनदी लेखापाल यांच्यावर फौजदारी गुन्हे प्रविष्ट केले आहेत. 

१. ग्रामीण भागातील जनतेला तातडीने कर्ज मिळण्यास स्थानिक पतसंस्था कर्जदाराकडून जुजबी कागदपत्रे, जामीनदारांच्या स्वाक्षर्‍या आणि अंगठे घेऊन कर्ज देतात. 
२. कर्जाजी आवश्यकता असणार्‍यांची संख्या न्यून असल्याने संचालकांचे नातेवाईक किंवा संचालक हेच पतसंस्थांमधून मोठ्या प्रमाणात कर्ज उचलत असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये आढळून आले आहे. 
३. राज्यातील नागरी पतसंस्थांमध्येही हाच प्रकार घडला असून संचालकांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे कारभार केला आहे. त्यामध्ये ठेवीदारांचे सुमारे ५२१ कोटी रुपये अडकले आहेत. 
४. सहकार कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून ३९८ कोटी रुपयांचे दायित्व दोषी संचालकांवर ठेवले आहे. तसेच दोषी संचालकांच्या २३६ कोटी रुपयांच्या मालमत्ताही शासनाधीन करण्यात आल्या असून २३ कोटी रुपये वसूलही झाले आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn