Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पुरोगाम्यांची बडदास्त !

लेखक बी. जयामोहन यांचा परिचय
 श्री. बी. जयामोहन
     कन्याकुमारी, तमिळनाडू येथील बी. जयामोहन यांचे तमिळ आणि मल्याळम् या दोन्ही भाषांवर प्रभुत्व असून ते श्रेष्ठ साहित्यिक आणि समीक्षक आहेत. त्यांची गाजलेली साहित्यिक कृती विष्णूपुरम् यात त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा आणि पौराणिक वास्तवाचा सखोल शोध घेतला आहे. त्यांची एक श्रेष्ठ साहित्यिक कृती म्हणजे वेन्मुरसु अर्थात् महाभारताचे आधुनिक पुनर्वर्णन ! त्यांच्या अनेक कादंबर्‍या लोकप्रिय ठरल्या आहेत.
     वस्तुस्थिती काहीही असो, आम्ही म्हणू तेच सत्य !, अशा भ्रमात वावरणार्‍या आणि आपले मत जनतेच्या गळी उतरवण्यासाठी आटापिटा करणार्‍या पुरोगामी मंडळींना देशाने अनेकवेळा पाहिले अन् अनुभवले आहे. त्याचे सध्याच्या काळातील ज्वलंत उदाहरण म्हणजे दादरी हत्याकांड आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर पुरो(अधो)गाम्यांकडून देशातील बहुसंख्यांक अर्थात् हिंदु समाज असहिष्णू झाला आहे, अशी आरोळी ठोकून पुरस्कार वापसीचे नाटक करण्यात येणे ! सदर लेखातून अशा पुरो(अधो)गाम्यांची रहाणी, त्यांच्याकडून सरकारी सोयीसुविधांचा होत असलेला गैरवापर अन् सध्याचे केंद्रातील सरकार त्यांच्यासाठी कशाप्रकारे पोटदुखी बनले आहे इत्यादी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
१. इंडियन इंटरनॅशनल सेंटरचे वातावरण ! 
     मी मला मिळालेले सांस्कृतिक सन्मान पारितोषिक घेण्यासाठी देहली येथील इंडियन इंटरनॅशनल सेंटर (IIC) येथे दोन दिवस निवासासाठी होतो. ही घटना वर्ष १९९४ ची आहे. तेथे रहात असतांना सत्तेची शक्ती काय असते, हे पदोपदी जाणवत होते. देहलीच्या अत्यंत शांत आणि प्रशस्त भागात आयआयसी हे केंद्र आहे. या केंद्रात हिरवळ असलेले अनेक मोठमोठे बंगले आहेत. येथे उच्चभ्रू समजले जाणारे लेखक, कलाकार आणि विचारवंत यांचा वावर असतो. येथे अत्यंत उत्कृष्ट खाद्य पदार्थ आणि उंची मद्य, वेटर अत्यंत अदबीने पुरवत असतात. लिपस्टीक लावलेल्या स्त्रिया आपली केशरचना व्यवस्थित करत असतात. सत्तेच्या वरच्या वर्तुळात वावरणारे एकमेकांचे अभिनंदन, स्वागत करत असतात. मी अनेक उत्तमोत्तम हॉटेल्समध्ये राहिलो आहे; परंतु आयआयसी सारखे राजेशाही वातावरण मी कुठेही अनुभवले नाही. 
२. पाश्‍चात्त्यांची जीवनशैली अंगीकारलेले पुरोगामी !
     आयआयसीची स्थापना भारत सरकारने केली आहे. ही स्वतंत्र संस्था असून येथे कलाकार आणि मुक्त विचार करणार्‍यांना उत्तेजन दिले जाते. वर्ष १९९४ मध्ये डॉ. करणसिंह या संस्थेचे प्रमुख होते. मी तेथे अनेक विचारवंत पाहिले. यातील अनेक मला इंग्रजी मासिकातील त्यांच्या लेखांमुळे माहीत होते. यू.आर्. अनंतमूर्ती हे तेथे जवळ जवळ चार वर्षे रहात होते. गिरीष कर्नाड काही दिवस तेथे होते. लेखक, पत्रकार, स्तंभलेखक प्रितिश नंदी, शोभा डे सारख्या मुक्त लेखकांचा येथे वावर होता. 
      मी त्या दिवशी तेथील वातावरणामुळे उत्तेजित झालो होतो, हे खरे आहे. माझी पत्नी गिरीष कर्नाड यांना भेटली आणि आपली ओळख करून दिली. मला समजले की, नयनतारा सेहगल तेथे प्रतिदिन उंची मद्याचा आस्वाद घेण्यासाठी येतात. मी त्या दिवशी त्यांना तेथे पाहिले. माझ्यासह ज्यांना पारितोषिक मिळणार होते, ते राजदीप सरदेसाई आणि अनामिका हक्सरही तेथे उपस्थित होत्या. 
३. साहित्यकार अथवा लेखक म्हणून मिरवणार्‍यांचे खरे स्वरूप
      तेथे पांढर्‍या रंगाच्या आणि खादीच्या साड्या नेसलेल्या काही महिला होत्या. त्यात कपिला वात्सायन आणि पुपुल जयकरही होत्या. त्या मेळाव्यात मला सहजतेने वावरता येत नव्हते, अवघडल्यासारखे वाटत होते. माझी ही स्थिती वेंकट स्वामीनाथन् यांनी ओळखली. ते म्हणाले, तुम्ही अवघडल्यासारखे राहू नका; कारण जमलेल्यांमध्ये तीन चतुर्थांश तत्कालीन सत्ताधार्‍यांचे चमचे आहेत. ज्यांना खरोखर मान द्यावा असे २-४ कलावंतसुद्धा येथे सापडणार नाहीत. खरे विद्वान विचारवंत तेथून पळ काढतात आणि दुर्दैवी गोष्ट म्हणजे या देशाची संस्कृती काय, हे ते ठरवतात. ते उच्च इंग्रजीमध्ये एक तासभर या विषयावर बोलू शकतात; पण ६१ व्या मिनिटाला ते निस्तेज होऊ लागतात; कारण त्यांना प्रत्यक्षात काहीच माहिती नसते, प्रत्यक्षात काहीही अनुभव नसतो. ही माणसे म्हणजे जुन्या वाड्यात टांगलेली हांड्या झुंबरे आहेत. यांचा उपयोग केवळ शोभेपुरता आहे. 
     प्रत्येकाच्या नावावर ४-५ ट्रस्ट तसेच स्वयंसेवी संस्था (एन्जीओ) असतात. हे तथाकथित विचारवंत एका परिषदेहून दुसर्‍या परिषदेसाठी विमानाने जातात. एकदा एखादा बंगला बळकावला की तो कधीही सोडत नाहीत. असे देहलीत ५ सहस्र बंगले बेकायदेशीरपणे यांनी बळकावलेले आहेत. हे जेएन्यू प्रमाणेच दुसरे शक्तीकेंद्र आहे. 
      सरकार यांना बाहेर काढू शकत नाही का ? मी विचारले. सरकारे बदलतात पण हे कायम रहातात. हे सर्व जवाहरलाल नेहरू असल्यापासून चालू आहे. सत्ताधारी आणि हे चमचे एकमेकाला साहाय्य करत असतात. काही आयएएस् अधिकारीही या जमावात सहभागी होण्याचा प्रयत्न करतात आणि सत्ताधार्‍यांच्या पायापाशी पोचतात.
४. संघटित बांडगुळांप्रमाणे वावरणारे डाव्या विचारांचे पुरोगामी
      ही माणसे म्हणजे परोपजीवी बांडगुळे आहेत; पण हे विचारवंत, कलावंत स्वतःला पुरोगामी डाव्या विचाराचे या नात्याने प्रसृत करतात. जग त्यांना निरनिराळ्या सेमिनारमध्ये भाग घेणारे या नात्याने ओळखतात. विशेष म्हणजे ही बांडगुळे संघटित असतात. भारतात काही विशेष घडले, तर पत्रकार यांचे मत विचारण्यास येतात. या लोकांनी काँग्रेसला एक डावा चेहरा दिला आहे. त्या मानाने त्यांच्यावर केला जाणारा खर्च किरकोळ आहे. हे विचारवंत म्हणजे देशाच्या खांद्यावर बसलेले बगळे आहेत. तेथून ते मासेमारी करतात. देशाचा सांस्कृतिक आणि कलाविषयक विचार काय असावा, ते हे लोक ठरवतात. 
५. बोजड भाषेचा वापर करून स्वतःला विचारवंत सिद्ध करण्याचा आटापिटा 
   मी नेहमी आयआयसीत येत असतो कारण येथेच संभाव्य अफवांचा उगम होतो. या तथाकथित विचारवंतांचे लेख इंग्रजी वृत्तपत्रांच्या मधल्या पानावर छापून येतात. खरेतर प्रत्यक्ष राजकारणाची त्यांना शून्य माहिती असते. बोजड भाषा वापरून ते स्वतःला विचारवंत म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. वरवरच्या माहितीच्या आधारे हे आरडाओरडा करतात आणि त्यासाठी त्यांना टीव्ही चॅनलवर वेळ मिळतो. 
   काही दिवसांपूर्वी मी माझ्या मित्रमंडळात बरखा दत्त कुप्रसिद्ध पत्रकार आहेत, असे म्हणालो. तेव्हा ते सर्व माझ्यावर तुटून पडलेेे पण थोड्याच दिवसात निरा राडीया टेप प्रकरणात हे सिद्ध झाले. पण तरीही बरखा दत्तची किंमत कमी झाली नाही. इतके हे पुरोगामी ताकदवान आहेत.
६. पुरोगाम्यांना प्रथमच धक्का बसणे
      इतिहासात प्रथमच या पुरोगाम्यांना धक्का बसला आहे. सहा महिने यांची चर्चा होती. मागच्या आठवड्यात सांस्कृतिक मंत्रालयाने या मुखंडांना बंगले सोडण्यासाठी आदेश दिले होते. त्यामुळे हे सरकार असहिष्णू आहे, अशी ओरड या गँगने चालू केली. उदा. चित्रकार जतीनदास आणि नंदितादास या नटीच्या वडिलांनी अनेक वर्षांपासून देहलीच्या मध्यवस्तीत मोठमोठे बंगले कह्यात ठेवले आहेत. याचे भाडे ते देत नाहीत, त्यामुळे नंदीतादास असहिष्णुतेविरुद्ध आकांत तांडव करत आहे. 
     मोदींनी या जमावाच्या विरुद्ध जाऊन मोठे आव्हान दिले आहे. मिडीयाचा वापर करून ही गँग भारताला अपकीर्त करण्याची एकही संधी देश-विदेशात सोडणार नाही. जणू काही भारतात रक्ताच्या नद्या वहात आहेत, असे चित्र निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 
- श्री. बी. जयामोहन (संदर्भ : पुरोगामी दहशतवाद, सांस्कृतिक वार्तापत्र (१६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn