Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

संभाजी ब्रिगेडचे मुसलमान प्रेम म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी प्रतारणा नव्हे का ? - पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते

      श्रीक्षेत्र आळंदी (जिल्हा पुणे), २९ नोव्हेंबर (वार्ता.) - छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेब या मुसलमानाने हालहाल करून मारले. त्याचेच वंशज असलेल्या मुसलमानांविषयी संभाजी ब्रिगेडला प्रेम का ? त्यांनी असे करणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी प्रतारणा नव्हे का, असे सडेतोड मार्गदर्शन राष्ट्रीय वारकरी सेनेचे अध्यक्ष पू. ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांनी केले. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याचा सांगता समारोप २९ नोव्हेंबर या दिवशी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर पार पडला. त्या वेळी ते उपस्थित वारकर्‍यांना मार्गदर्शन करत होते. या समारोपाला राष्ट्र्रीय युवा कीर्तनकार हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोडही उपस्थित होते. पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते पुढे म्हणाले की,
  • मनुस्मृती न मानणार्‍यांनी ती जाळण्याआधी एकदा वाचली, तर त्यांना त्यात काय आहे, ते कळेल.
  • धर्माविषयीचे विधीनिषेध पाळण्याचे नियम अनेक महाराजांसह कुणालाच ठाऊक नाहीत. त्यामुळे सर्वांनाच धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn