Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

बगलामुखी-ब्रह्मास्त्र याग आणि महागणपति होम यांवेळी घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी

Add caption
    रामनाथी - हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि साधकांवरील संकटांचे निवारण व्हावे, यांसाठी भृगू महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात बगलामुखी याग (ब्रह्मास्त्र याग) करण्यात आला. या निमित्ताने १ मासभर १ लक्ष २५ सहस्र एवढा बगलामुखी मंत्राचा जप करण्यात आला. त्यानंतर त्याच्या दशांश म्हणजे १२ सहस्र ५०० या संख्येने चाफ्याच्या फुलांचे हवन ४ आणि ५ नोव्हेंबर या दिवशी करण्यात आले. तसेच सप्तर्षि जीवनाडीपट्टीतून महर्षींनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे ६ नोव्हेंबर या दिवशी प.पू. डॉक्टरांचे जन्मनक्षत्र उत्तराषाढा या नक्षत्रावर विशेष महागणपतीहोम आणि ब्रह्मास्त्र याग करण्यात आला.
     ब्रह्मास्त्र यागाच्या वेळी श्री बगलामुखी देवी, श्री काळभैरव आणि नवग्रह देवता यांचे पूजन करण्यात आले. या वेळी सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, पू. डॉ. मुकुल गाडगीळ आणि सनातनचे साधक उपस्थित होते. यागाचे पौरोहित्य सनातन साधक-पुरोहित पाठशाळेेचे संचालक श्री. दामोदर वझेगुरुजी, अध्यापक वेदमूर्ती श्री. केतन शहाणेगुरुजी, तसेच वेदमूर्ती आेंकार पाध्ये, वेदमूर्ती सिद्धेश करंदीकर वेदमूर्ती मंदार मणेरीकर साधक-पुरोहित श्री. अमर जोशी, श्री. लोमेश पाठक, श्री. अंबरिश वझे आणि श्री. इशान जोशी यांनी केले. 
     आश्रमात ४ आणि ५.११.२०१६ या दिवशी बगलामुखी-ब्रह्मास्त्र याग आणि ६.११.२०१६ या महागणपति होम आणि बगलामुखी-ब्रह्मास्त्र याग झाले. या तीन दिवसांत घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी पुढे देत आहोत.
१. चांगल्या घडामोडी
१ अ. ४.११.२०१६ 
१. यागाच्या आदल्या दिवसापासून बाजूच्या एका झाडावर पुष्कळ वेळ अनेक वानर बसले होते. 
२. याग चालू असतांना आश्रमाच्या समोरील परिसरात ४ वेळा गरुड मुक्तपणे विहार करत होता.
३. यागाच्या परिसरात खार आणि खंड्या अन् दयाळ हे पक्षी आले होते. 
४. यागाच्या आदल्या दिवशी आणि याग चालू असतांना विविध प्रकारचे सुगंध येत होते. याग चालू असतांना एका ठराविक क्षणी हीना आणि केवडा यांचा तीव्र सुगंध आला. त्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. गाडगीळकाका यांना महर्षींच्या अस्तित्वाची प्रकर्षाने जाणीव झाली. 
५. एरव्ही आदल्या दिवशी आणलेली चाफ्याची फुले दुसर्‍या दिवशी सायंकाळपर्यंत टवटवीत रहात नाहीत; परंतु यागासाठी आणलेल्या चाफ्याच्या फुलांवर विभूती, तीर्थ शिंपडणे इत्यादी आध्यात्मिक उपाय केल्याने फुले सायंकाळपर्यंत टवटवीत राहिली.
१ आ. ५.११.२०१६
१. सकाळी ६.३० वाजता काळ्या रंगाचे ३ कुत्रे आश्रमाबाहेर उभे होते. त्यातील एक कुत्रा आश्रमाच्या आवारात येऊन काही वेळ यज्ञकुंडाकडे बघत होता. त्याच दिवशी हवन पूर्ण झाल्यावर काळभैरवाष्टक म्हटले. कुत्रा काळभैरवाचे वाहन आहे.
२. अनेक पक्षी यज्ञकुंड आणि यज्ञस्थळी बसलेल्या सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांच्या अगदी जवळ आले होते.
३. हवन चालू असतांना आश्रमाच्या अगदी जवळून तीन बगळे आकाशात उडत गेले. (बगळा हे श्री बगलामुखी देवीचे वाहन आहे.)
१ इ. ६.११.२०१६
१. याग चालू असतांना आश्रमाच्या अगदी जवळून अनेक बगळे उडत जातांना दिसले. 
२. त्रासदायक घडामोडी
२ अ. ४.११.२०१६
१. यागात वापरलेल्या ४ नारळांना तडे गेले.
२. यागाच्या आरंभी प्रार्थना केल्यावर समोर असलेल्या औदुंबर वृक्षाची न सुकलेली हिरवी पाने वर्षाव झाल्याप्रमाणे अचानक खाली गळून पडली. 
२ आ. ६.११.२०१६ 
१. यज्ञाच्या परिसरापासून १०० फूट अंतरावर दोन कावळे मरून पडले होते.
- सनातन साधक-पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.११.२०१६) 
१. महागणपति होम महर्षींना अपेक्षित असा झाल्याची त्यांनी दिलेली साक्ष
     बुध ग्रहासाठी अर्पण केलेला पेरु चौरंगावरून आपोआप मारुतीच्या घुमटीच्या दिशेने घरंगळत जाणे : ६.११.२०१६ या दिवशी सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे प.पू. गुरुदेवांच्या उत्तराषाढा जन्मनक्षत्रावर महागणपति होम केला. चौरंगावर नवग्रहांची पूजा मांडली होती. होम चालू असतांना बुध ग्रहासाठी अर्पण केलेला पेरु आपोआप खाली पडून घरंगळत यज्ञकुंडाच्या बाजूला असलेल्या मारुतीच्या घुमटीच्या दिशेने गेला. प.पू. गुरुदेवांचा जन्मवार बुधवार आहे. खाली पडलेला पेरु बुध या ग्रहदेवतेला अर्पण केला होता. ही महर्षींनी दिलेली साक्ष आहे, असे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितले. येणार्‍या घोेर आपत्काळात सर्व साधकांचे रक्षण होण्यासाठी महर्षि याग करायला सांगतात, आम्हा साधकांकडून तो करवून घेतात आणि याग त्यांना अपेक्षित असा झाल्याचे सांगून यज्ञाच्या फलप्राप्तीची साक्षही देतात. यासाठी आम्ही सर्व साधक महर्षींच्या चरणी कृतज्ञ आहोत !
२. हवन चालू असतांना यज्ञमंडपात स्थापन केलेल्या काळभैरवाच्या मूर्तीला घातलेला हार एका बाजूने खाली पडला. हा शुभशकून असून यातून काळभैरवाचे आशीर्वाद यज्ञाला प्राप्त झाल्याचे महर्षींनी सांगितले. 
यागात आलेले अनिष्ट शक्तींचे अडथळे आणि प्रार्थना
अन् आध्यात्मिक उपाय यांमुळे झालेलेे देवाचे साहाय्य
      यागाच्या प्रारंभी वातावरणात दाब जाणवत होता. शंखनाद करतांना प्रथमच शंख वाजेनासा झाला. उपस्थित पुरोहितांना तीव्र ग्लानी येणे, चक्कर येणे इत्यादी त्रास होत होते. यागात आहुती देण्यासाठी आणलेली सोनचाफ्याची फुले टिकवण्यासाठी वापरत असलेली दोन शीतकपाटे अचानक नादुरुस्त झाली. यज्ञकुंडातील अग्नि नेहमीप्रमाणे लगेच प्रज्वलित झाला नाही. यज्ञातून येणार्‍या धुराने डोळ्यांचा जास्त दाह होत होता. अशा स्थितीत काही वेळ हवन केले. त्यानंतर ब्रह्मवृंद आणि यज्ञाला उपस्थित असलेल्या सर्वांनी विधीतील अडथळे दूर होण्यासाठी देवतांना प्रार्थना केली. त्यानंतर यज्ञमंडपात स्थापन केलेल्या श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या चरणांशी काळ्या रंगाचा एक मोठा सुरवंट येऊन पडला. उपस्थित सर्वांनाच या काळ्या आणि त्रासदायक दिसणार्‍या सुरवंटाच्या माध्यमातून सर्व संकटे देवीच्या चरणांशी आली आहेत, असे जाणवले. 
      हे सर्व होत असतांनाच यज्ञकुंडातील अग्नि फट् असा आवाज करत चांगल्या प्रकारे प्रज्वलित झाला. यानंतर केलेला शंखनादही एका लयीत झाला. त्यानंतर यज्ञातील अडथळे दूर होण्यासाठी बगलादिग्बंधन रक्षास्तोत्राचे पठण करणे आणि यज्ञ परिसरात विभूती फुंकरणे, असे आध्यात्मिक उपाय केले. या सर्वांमुळे वातावरणातील दाब न्यून होऊन पुरोहितांना येत असलेली ग्लानी, चक्कर, घसा बसणे इत्यादी त्रास अल्प वेळात दूर झाले. सर्वांना मारक तत्त्वाची अनुभूती येऊन चैतन्य जाणवू लागले. वरील प्रसंगातून येणार्‍या आपत्काळाची भीषणता, अनिष्ट शक्तींचे तीव्र अडथळे कसे असतात आणि श्रीमत् नारायणाच्या कृपेने महर्षि साधकांची सर्वातोपरी काळजी कशी घेत आहेत, हे लक्षात आले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn