Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अभिनेता अक्षय कुमार यांच्या 'टॉयलेट : एक प्रेमकथा' चित्रपटाचे चित्रीकरण न थांबवल्यास आत्महत्या करण्याची महंतांची धमकी !

     मथुरा - 'टॉयलेट : एक प्रेम कथा' या चित्रपटाचे मथुरा आणि वृंदावन येथे चालू असलेले चित्रीकरण १ डिसेंबरपर्यंत थांबवले गेले नाही, तर आमरण उपोषण करून आत्महत्या करू, अशी धमकी चतुर्संप्रदायाचे महंत फूलडोल महाराज यांनी दिली आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाला विरोध केला जात आहे. तसेच बरसाना अन् नंदगाव यांच्यात वैवाहिक संबंध जोडले जात नसतांना या चित्रपटात तसे संबंध दाखवण्यात आले आहेत, यालाही विरोध होत आहे. यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक नारायण सिंह यांची जीभ कापणार्‍यास १ कोटी रुपयांचे बक्षीसही घोषित करण्यात आले आहे. काही लोकांनी येथील खासदार हेमामालिनी यांना निवेदन देऊन चित्रीकरण बंद करण्याची मागणी केली आहे. हेमामालिनी यांनी म्हटले आहे की, मी लवकरच अभिनेता अक्षय कुमार यांच्याशी या विषयावर चर्चा करून वाद मिटवण्याचा प्रयत्न करीन.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn