Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राष्ट्र हे सैन्याच्या बळावरच चालते ! - स्वातंत्र्यवीर सावरकर

     भारतीय लष्कराने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’विषयी सर्व पक्षांच्या विचारांचा डोंब उसळला होता आणि त्याच्या पुराव्यावरून वादही निर्माण झाला. हे होत असतांनाच वर्ष २०११ मध्ये लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे ‘द हिन्दू’ या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले. ते वाचून मला पुण्यातील रमणबाग येथे २ ऑगस्ट १९४१ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले भाष्य आठवले. 
पाकिस्तानी रोगावर औषध योजना !
     त्या भाषणाचा विषय होता, ‘‘पाकिस्तानी रोगावर औषध योजना !’’ व्याख्यानाचा आरंभ विलक्षण होता. ते म्हणाले, ‘‘मी जे बोलणार आहे, तुम्हा हिंदूंच्या हितासाठी. तुमच्या पितृभूमीत आणि पुण्यभूमीत तुम्ही सन्मानाने रहावे यासाठी. पाकिस्तानचा प्रश्‍न तर्काने, तत्त्वज्ञानाने अथवा टिकेने सुटणार नाही. तो सुटेल काय तो हिंदूसंघटनानेच. तुम्ही कुठेही जा; पण अंतःकरणात हिंदुत्वाची जागती ज्योत पेटलेली राहू द्या आणि प्रत्येक ठिकाणी भगवा ध्वज उंच फडकवत ठेवा. मी जे सांगतो आहे, ते तुम्ही मान्य करा किंवा न करा; पण त्याविषयी मला निदान शाप तरी देऊ नका !
    याच ठिकाणी ते म्हणाले, ‘‘करार आणि संमतीपत्र याची चिंता करू नका. त्या कराराच्या कागदाच्या उलट्या बाजू नेहमीच कोर्‍या असतात. त्यावर इष्ट ते करार योग्य ती वेळ आल्यावर लिहिता येईल. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ‘स्वातंत्र्याच्या कागदी ठरावाच्या खर्ड्यांनी सारी पृथ्वी जरी तुम्ही झाकून टाकली, तरी स्वराज्य कधीच मिळणार नाही.’ कागदी ठराव्याच्या भार्‍यांनी नव्हे, तर रायफलीच्या मार्‍यांनीच स्वातंत्र्य जिंकता येते, हे विसरू नका.’’
लष्कर समर्थ, तर देश समर्थ !
देशातील सध्या घडणार्‍या घटना,
१. हिंदुस्थानचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नवी देहलीमध्ये वार्ताहर परिषदेत सांगितले, ‘‘आम्ही पाकिस्तानच्या सीमा वर्ष २०१८ पर्यंत बंद (सील) करणार आहोत.’’
२. हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ ऑक्टोबर या दिवशी नवी देहलीमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या प्रसंगी आपले विचार प्रकट केले. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘आमच्या न्यायामुळे घाबरू नका.’’ ‘लष्कर समर्थ, तर देश समर्थ’, हाच धागा पकडत लष्कराच्या सामर्थ्याचे महत्त्व स्पष्ट करतांना ते म्हणाले, ‘‘देशाला सामर्थ्यवान करायचे असेल, तर प्रचंड क्षमता असलेले लष्कर आवश्यक आहे.
     वरील विचार ऐकून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुणे येथे वर्ष १९५१ आणि १९६१ मधील व्याख्यानांची आठवण झाली. त्यांनी देश स्वतंत्र झाल्यावर देशाच्या सीमा बंद (सील) करण्याची मागणी वर्ष १९५१ मध्ये केली होती. त्याचप्रमाणे वर्ष १९६१ मध्ये पुण्यात झालेल्या भाषणात ते म्हणाले होते, ‘‘मला कोणतेही पद नको; पण तुम्ही मला जर राष्ट्रपती केले, तर प्रथम मी २ कोटी खडे सैन्य उभारेन आणि ख्रुश्‍चेव्हने जसा संयुक्त राष्ट्रसंघात (युनो) जोडा काढून दाखवला, तशी त्याला माझी चप्पल काढून दाखवेन. राष्ट्र हे सैन्याच्या बळावरच चालते.’’
     स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या विचारातून ते किती द्रष्टे होते, हे लक्षात येते. संगीतात ‘सा’ला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व राष्ट्रीय विचारांच्या राजकारणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामधील ‘सा’ला आहे, हे निश्‍चित ! - श्री. विद्याधर नारगोलकर, पुणे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn