Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कर्नाटकातील रा.स्व. संघाचे स्वयंसेवक रुद्रेश यांना ठार करण्याचा कट २-३ महिन्यांपूर्वीच शिजला होता !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या 
हत्या झाल्यावर पुरोगामी, बुद्धीवादी, निधर्मी, 
लेखक आदी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
       बेंगळुरू - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक रुद्रेश यांची हत्या केल्याच्या प्रकरणी आसिम शरैफ, महंमद सादिक, महंमद मुजिबुल्लाह, वासिम अहमद आणि इरफान पाशों या ५ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीत त्यांनी रुद्रेश यांच्या हत्येचा कट २-३ महिन्यांपूर्वीच रचला होता, अशी माहिती दिली आहे. तसेच रुद्रेश यांच्या हत्येला मुर्गी कट असे म्हटल्याचे त्यांनी सांगितले. जशी कोंबडीची हत्या एकाच वारात तिची मान कापून केली जाते, तशाच प्रकारे ही हत्या करण्यात आल्याने तिला मुर्गी कट हा सांकेतिक शब्दप्रयोग वापरण्यात आला. या सर्व धर्मांधांना एकाच वारामध्ये व्यक्तीला ठार मारण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. 
       हे सर्व धर्मांध पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफ्आय) आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्डीपीआय) यांच्याशी संबंधित आहेत. त्यांना केरळ येथे प्रशिक्षित केल्याचे उघडकीस आले आहे.
       बेंगळुरूच्या आर्.टी. नगर येथील मशिदीजवळ असलेल्या मुजिब याच्या कार्यालयामध्ये रुद्रेश यांना ठार मारण्याचा कट रचला गेला होता, असे उघडकीस आले आहे. बैठकीचे नेतृत्व आसिम करत असे. त्याने सहकार्‍यांना सांगितले की, हिंदूंचे नेते अल्पसंख्यांकांच्या विरोधात कार्य करतात आणि त्यांच्या मार्गात संकटे उत्पन्न करतात. १६ ऑक्टोबरला रुद्रेश यांची हत्या झाली; परंतु तत्पूर्वी या धर्मांधांनी रुद्रेश यांना २ वेळा ठार करण्याचा प्रयत्न केला होता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn