Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मुसलमानांच्या घुसखोरीमुळे जर्मन लोक ‘आपल्याच देशात परके’ !

     बर्लिन - मुसलमानांच्या घुसखोरीमुळे एक तृतियांश जर्मनांना त्यांच्याच देशात परके असल्यासारखे वाटत असल्याचे एका सर्वेक्षणाून समोर आले आहे. ‘फ्राइडरिच एलबट फाऊंडेशन’ या जहालमतवादी संघटनेचे अभ्यासक मिट्टे यांनी वाढता हिंसाचार, वेगवेगळ्या धार्मिक गटांमधील फूट, धर्माच्या नावाखाली चालू असलेले ध्रुवीकरण, लोकशाहीच्या संदर्भातील प्रचंड अविश्‍वास यांचा जर्मनीवर धोकादायक परिणाम होत असल्याचे म्हटले आहे.
     एका नवीन सर्वेक्षणानुसार मुसलमानांच्या वाढत्या संख्येमुळे ३४.७ टक्केे जर्मन लोक, ‘आम्हाला आमच्याच देशात परके असल्यासारखे वाटते’, असे म्हणणारे आहेत. तितकेच लोक ‘जर्मनीत पुष्कळ लोक विदेशी आहेत’, अशी तक्रार करतांना दिसतात. ‘डिव्हायडेड मिडल-होस्टाइल कन्डिशन्स’ या संस्थेच्या अहवालानुसार १५ टक्के जर्मन नागरिकांनी मुसलमानांना नागरिकत्व देणे बंद करण्याची मागणी केली आहे. अँजेला मार्केल यांच्या विस्थापितांविषयीच्या मुक्त धोरणामुळे जर्मनीमध्ये येणार्‍या नागरिकांची संख्या वाढतच गेली आणि गेल्या वर्षी १.१ दशलक्षाहूनही अधिक परदेशी नागरिक जर्मनीमध्ये आले. नागरिकांच्या याविरोधातील वाढत्या असंतोषामुळे अँजेला मार्केल यांनी या वर्षी या प्रक्रियेला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे; असे असले तरी, टिकाकारांच्या म्हणण्यानुसार याला आता खूप उशीर झाला आहे. इमिग्रेशनच्या या मुक्त धोरणामुळे अँजेला मर्केेल यांची लोकप्रियता धोक्यात आली आहे. द्वैवार्षिक सर्वेक्षणानुसार इमिग्रेशनच्या विरोधातील अल्टरनेटिव्ह फॅार जर्मनी (एएफ्डी) पक्ष जोर धरत असून त्या पक्षाचे सदस्य या धोरणाच्या तीव्र विरोधात आहेत. या सर्वेक्षणानुसार एएफ्डीचे ६८.४ टक्के समर्थक विदेशी नागरिकांची घृणा करतात, तर ६ टक्के ग्रीन्स पक्षाचे समर्थक आणि १५.८ टक्के अँजेला मार्केल यांच्या ‘ख्रिश्‍चन डेमोक्रॅटिक युनियन’ पक्षाचे अनुयायी हे विदेशी नागरिकांचे विरोधक आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn